News Flash

दहिसरमधील दूध भेसळीचा अड्डा उद्ध्वस्त

कारवाईत १२२ लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले.

मुंबई : दहिसर येथील वीर संभाजी नगरमध्ये छापा घालून गुन्हे शाखेने दूध भेसळ करणाऱ्या व्यक्तीस बेड्या ठोकल्या. या कारवाईत १२२ लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले. सायदुल कावेरी (३५) असे आरोपीचे नाव आहे.

संभाजी नगर येथे एका खोलीत मोठ्या प्रमाणावर दुधात भेसळ करून ते आसपासच्या निवासी संकुलांमध्ये वितरित करण्यात येत असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक महेश तावडे, निरीक्षक सचिन गावस, उपनिरीक्षक हरीश पोळ यांना मिळाली होती. त्याआधारे गुरुवारी पहाटे ४ च्या सुमारास अन्न व औषध प्रशासनालयातील अधिकाऱ्यांसोबत गुन्हे शाखेने कावेरी याचा अड्डा उद््ध्वस्त के ला. भेसळ करण्यासाठी पाणी, दूध पिशवी पुन्हा जशीच्या तशी करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री आरोपीकडे आढळली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 12:01 am

Web Title: milk adulteration in dahisar akp 94
Next Stories
1 आरेमध्ये पाच एकरचा भराव
2 ‘स्नेकहबअ‍ॅप’ची मराठी आवृत्ती
3 Lockdown : “मुख्यमंत्र्यांची पुन्हा धमकी”, लॉकडाऊनवरून संजय निरुपम यांचा निशाणा!
Just Now!
X