News Flash

मुंबई : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीचा कोर्टातून पोबारा

अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक असलेल्या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केल्याची घटना

अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी डी. एन. नगर आणि अँटॉप हिल पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयात अटक असलेल्या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केल्याची घटना शनिवारी घडली.  मोहम्मद बादशाह मोहम्मद सलीम शेख असं फरार आरोपीचं नाव आहे. पोबारा केलेल्या आरोपीच्या विरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

अटक आरोपी मोहम्मद बादशाह मोहम्मद सलीम शेख याच्यावर अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केळ्याचा गुन्हा डी. एन. नगर पोलीस ठाणे आणि अँटॉप हिल पोलीस ठाण्यात भादंवि ३७६ आणि कलम ४, ८, आणि १२ पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात  आला होता. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. शनिवारी आरोपी शेख याला कारागृहातून न्यायालयीन प्रक्रियेसाठी न्यायालयात आणले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आरोपी शेख याने पोलिसांची नजर चुकवत पलायन केले आणि एकाच खळबळ उडाली. याबाबत कुलाबा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात  आली. आरोपी  मोहम्मद बादशाह मोहम्मद सलीम शेख याचा शोध कुलाबा पोलीस यांच्यासह गुन्हे शाखा घेत असल्याची माहिती उपायुक्त अभिषेक त्रिमुखे  यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2019 9:16 am

Web Title: minor rape accused ran away from session court mumbai
Next Stories
1 हरीश साळवे उपलब्ध नसल्याने राज्य सरकारची पंचाईत
2 रवी पुजारीचा ठावठिकाणा शोधण्यात पोलीस अपयशी
3 सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनावर ९ टक्के महागाई भत्ता
Just Now!
X