कोलकाता येथून पळालेल्या महिलेला पुन्हा तिच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात वाशी पोलिसांना सोमवारी यश आलं. या २७ वर्षीय महिलेने नैराश्यातून घर सोडलं होतं. ती २६ डिसेंबर रोजी ही महिला वाशी रेल्वे स्थानकाजवळ आढळून आली होती.

पोलीस उपनिरीक्षक सोपान राखोंडे यांना ही महिला आढळली होती, त्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ”आम्हाला वाशी रेल्वे स्थानकाजवळ ही महिला मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास आढळली, तिची चौकशी केली असता तिने १८ डिसेंबर रोजी घरातून पळ काढला असल्याचे समजले. मात्र महिला अधिक तपाशील देत नसल्याने, तिची माहिती सर्वत्र पोहचवण्यासाठी आम्ही स्थानिक बंगाली समाजातील लोकांची मदत घेतली. तिच्या बद्दलचा संदेश कोलकातामधील व्हॉट्स ग्रुपवर देखील पाठवला गेला, ज्याची आम्हाला मदत झाली.”

आणखी वाचा- मुंबईतील घटना! बदला घेण्यासाठी तिने टाकलं हनी ट्रॅप, पण… ऐनवेळी डाव फिस्कटला

तसेच, ”८ जानेवारी रोजी आम्हाल माहिती मिळाली की, कोलकातामधील पोलीस स्टेशनमध्ये १८ डिसेंबर रोजी, एक महिला हरवल्याची तक्रार दाखल झालेली आहे. त्यावरून आम्ही तिच्या कुटुंबियांशी संपर्क साधला व संबंधित महिलेबद्दल माहिती दिली. त्यानंतर तिचे कुटुंबीय  १० जानेवारी रोजी इथं आले व  या महिलेला आम्ही तिच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आले.” असं देखील पोलीस उपनिरीक्षक सोपान राखोंडे यांनी सांगितलं.