20 April 2019

News Flash

VIDEO: मनसे कार्यकर्त्यांनी फोडलं भाजपा नगरसेवकाचं कार्यालय

काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला मनसेने पाठिंबा दिला असून आंदोलनाला हिंसक वळण लागताना दिसत आहे

काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला मनसेने पाठिंबा दिला असून आंदोलनाला हिंसक वळण लागताना दिसत आहे. एकीकडे पुण्यात बसची तोडफोड केल्याचं समोर आलं असताना मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी दिंडोशीत भाजपा नगरसेवकाचं कार्यालय फोडलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान न करण्याची सूचना केली असतानाही कार्यकर्ते रस्त्यावर हिंसा करताना दिसत आहे. पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज ‘भारत बंद’ पुकारला आहे.

मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन ‘भारत बंद’ला पाठिंबा देतील अशी माहिती राज ठाकरे यांनी बैठकीनंतर जाहीर केलेल्या एका पत्राद्वारे दिली होती. त्याचबरोबर ‘भारत बंद’ला रस्त्यावर उतरुन मनसे कार्यकर्ते पाठिंबा देतील, पण याचबरोबर कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होणार नाही, याचीही काळजी घेतली जावी असं आवाहन राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं होतं.

या पक्षांचा पाठिंबा
‘भारत बंद’ला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, आ. प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी या पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

First Published on September 10, 2018 12:30 pm

Web Title: mns activist vandalise bjp corporator office in dindoshi bharat bandh