News Flash

रवी पुजारी गँगच्या दोघांना पोलीस कोठडी

रवी पुजारी टोळीचा सर्वात मोठा खबरी आकाश शेट्टी होता. तर  विलियम रोड्रिक्स यांला बिल्डरकडून खंडणी मागण्याच्या आरोपात अटक करण्यात आलेली होती.

गँगस्टर रवी पुजारी टोळीच्या आकाश शेट्टी व विलियम रोड्रिक्स यांना मोक्का न्यायलयात हजर केले असता न्यायलयाने त्यांना पाच फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या वर्षातील मोक्का कायद्यातंर्गत झालेली ही पहिली कारवाई आहे.

रवी पुजारी टोळीचा सर्वात मोठा खबरी आकाश शेट्टी होता तर  विलियम रोड्रिक्स यांला बिल्डरकडून खंडणी मागण्याच्या आरोपात अटक करण्यात आलेली होती. रवी पुजारी याचा विश्वासू दशरथ शिंदे याला दोन वर्षापूर्वीच पोलिसांनी गजाआड केल्यानंतर आकाश शेट्टी रवी पुजारीचा हस्तक आणि खास माणूस झाला.

त्याने रवी पुजारी टोळीत खबरी आणि शूटर यांचे जाळे विणले. विलियम याला अटक झाल्यानंतर आकाश शेट्टी घर आणि हॉटेल सोडून परागंदा झाला. मात्र मुंबई गुन्हे शाखेने आकाश शेट्टीला अटक केली. रवी पुजारीशी थेट संपर्क असलेल्या आकाश आणि विलियम यांना मुंबई पोलिसांनी मोक्का लावला. त्यांना न्यायालयात नेले असता ५ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायलयाने दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2019 9:26 pm

Web Title: mocca court send two members of ravi pujari gang to police custody
Next Stories
1 मुंबई: भाडेकरूंनी 125 वर्ष जुन्या चाळीचं घेतलं अंतिम दर्शन
2 ‘महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ आहे आणि रहाणार’
3 मराठा आरक्षण: मागासवर्ग आयोगाचा अहवाल याचिकाकर्त्यांना द्या, हायकोर्टाचे निर्देश
Just Now!
X