29 September 2020

News Flash

मान्सून मुंबईत दाखल

अखेर रडतखडत मान्सून रविवारी मुंबईत दाखल झाला. कोकणात दाखल झाल्यानंतर वादळामुळे रखडलेल्या मान्सूनने रविवारी पुढे आगेकूच केली.

| June 16, 2014 12:04 pm

अखेर रडतखडत मान्सून रविवारी मुंबईत दाखल झाला. कोकणात दाखल झाल्यानंतर वादळामुळे रखडलेल्या मान्सूनने रविवारी पुढे आगेकूच केली. पूर्ण कोकण किनारपट्टीसह, मुंबई, मध्य महाराष्ट्राचा भाग व्यापत सांगलीपर्यंत मान्सूनने धडक मारली. मुंबईत मान्सून दाखल झाला तरी रविवारी दिवसभर पावसाचा पत्ता नव्हता. मात्र रात्री मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात मुसळधार पाऊस पडला.मान्सूनच्या प्रवासाला पोषक असे वातावरण असल्यामुळे चोवीस
तासांत तो पुण्यासह मध्य महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2014 12:04 pm

Web Title: monsoon arrives in mumbai
Next Stories
1 आज शाळेची घंटा खणाणणार
2 मरीन ड्राइव्ह समुद्रात तरुण बुडाला
3 सिंचनात ‘हात धुऊन घेणारे’ सारेच मोकळे
Just Now!
X