जयेश शिरसाट

घरी आल्याआल्या मूल बिलगते, अंगावरच्या दुधासाठी हट्ट धरते. चार तासांचा प्रवास आणि बारा तास काम के ल्यावर आपल्याला करोनाची लागण झालेली नाही ना, आपल्यामुळे तान्ह्य़ा मुलाला संसर्ग होणार नाही ना, ही भीती घरात शिरताना मन अस्वस्थ करून जाते. यावर उपाय म्हणून मी मुलाचं दूधच तोडलं. मुलाला सवय व्हावी आणि अध्र्यावर पान्हा बंद के ल्याचा मला त्रास होऊ नये म्हणून दोघेही उपचार घेत आहोत. मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या आणि बाळंतपणानंतर कर्तव्यावर रुजू झालेल्या मातेची ही व्यथा.

करोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढल्यानंतर बहुतांश पोलीस ठाण्यांनी गरोदर महिला अधिकारी, अंमलदारांना कामावर न येण्याची सूट दिली. गरोदर असलेल्यांप्रमाणेच बाळंतपणानंतर कर्तव्यावर रुजू झालेल्या महिला अधिकारी, अंमलदारांनाही सुटी जाहीर करावी किंवा अन्य सोयीसुविधा पुरवाव्यात अशी मागणी जोर धरत आहे. मुंबई पोलीस दलात गरोदर आणि नुकत्याच बाळंत झालेल्या अधिकारी, अंमलदारांची संख्या ५०० असावी, असे सांगण्यात आले.

सर्वसाधारणपणे प्रसुतीनंतर जास्तीत जास्त काळ सुटी मिळावी, असा प्रयत्न महिला अधिकारी, अंमलदार करतात. म्हणजेच सहा महिन्यांची प्रसूती रजा मिळतेच. पण खात्यावर जमा असलेल्या सुट्टय़ाही या रजेला जोडून घेता येतात. त्यामुळे मुले सहा ते आठ महिन्यांची झाली की महिला अधिकारी, अंमलदार कामावर रुजू होतात. लहान मुलांना अंगावरचे दूध सुरू असते. अशा परिस्थिती महिलांची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे प्रशासकीय काम असो किं वा पोलीस ठाण्याबाहेरील कर्तव्य, संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे इतरवेळी टाळले तरी दुधासाठी मुलांना जवळ घ्यावेच लागते. आपल्यामुळे आपल्या मुलांना संसर्ग होऊ नये, ही भावना पोलीस किं वा पालिके च्या प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याच्या मनात आल्याशिवाय राहात नाही. कधीकधी या काळजीचे रूपांतर भीतीत होते. त्यामुळेच मी माझ्या मुलाचे दूध बंद करण्याचा निर्णय घेतला. पण त्यामुळे मुलाचे वजन कमी झाले आहे, अशी व्यथा एकीने मांडली.

कामावरून घरी आल्यावर मी माझ्या मुलीला जवळही घेत नाही, असे अन्य एका अधिकारी महिलेने सांगितले. पोलीस दलात पन्नाशी पुढल्या सर्वच अधिकाऱ्यांना विशेषत: आजार असलेल्यांना घरीच राहाण्याचे आदेश जारी झाले आहेत. त्यामुळे निश्चितच पोलीस ठाण्यात उरलेल्या मनुष्यबळावर अतिरिक्त ताण पडला. याचाच परिणाम म्हणून प्रशासकीय कर्तव्य किंवा पोलीस ठाण्यांत बसून कारकुनी काम करणाऱ्यांना बंदोबस्तासाठी बाहेर काढण्यात आले आहे.