News Flash

‘महावितरण’चे देशपांडे, माने हरयाणात संचालक मंडळावर

‘महावितरण’च्या वाणिज्य विभागाचे कार्यकारी संचालक अभिजीत देशपांडे आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक उत्तम माने यांची उत्तर हरयाणा विद्युत वितरण कंपनीच्या संचालक मंडळावर अर्धवेळ संचालक

| March 17, 2013 01:42 am

‘महावितरण’च्या वाणिज्य विभागाचे कार्यकारी संचालक अभिजीत देशपांडे आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक उत्तम माने यांची उत्तर हरयाणा विद्युत वितरण कंपनीच्या संचालक मंडळावर अर्धवेळ संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे.
अभिजीत देशपांडे हे १९९७ मध्ये कार्यकारी अभियंता म्हणून वीज मंडळात रूजू झाले होते. २००९ पासून त वाणिज्य विभागाचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहत आहेत. वाणिज्यिक विषयांबरोबरच नियामक आयोगाशी संबंधित कामकाजातील ते तज्ज्ञ मानले जातात. तर उत्तम माने हे २००९ पासून माहिती तंत्रज्ञान विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत.
केंद्र सरकारच्या ‘इंडिया स्मार्ट ग्रीड’ या फोरमचे ते सदस्य आहेत. महाराष्ट्रातील वीजक्षेत्रात सुरू असलेल्या सुधारणांच्या अनुभवाचा लाभ हरयाणाला मिळावा यासाठी ही नियुक्ती झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 1:42 am

Web Title: mseb s deshpande appoint as a board of director in haryana electricity board
टॅग : Mseb,Power
Next Stories
1 रुग्णालयांतील औषध विक्रेत्यांची चौकशी करावी
2 शिवाजीनगर रेल्वेस्थानकाचा विकास ‘पीपीपी’तत्त्वावर
3 घरांच्या महागाईत मुंबई शहर जगात १६वे
Just Now!
X