News Flash

करोनाबाधित रुग्ण फिरत होता रस्त्यावर; BMCनं पुन्हा रुग्णालयात केलं दाखल

नायर रुग्णालयात हलवणार

संग्रहित छायाचित्र

करोनाच्या थैमानामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे नागरिक बाहेर पडायचंही टाळत आहेत. तर काहीजण बाहेर पडल्यानंतर काळजी घेताना दिसत आहेत. अशा काही करोना बाधितांकडून अक्षम्य चुका होत असल्याचंही दिसत असून, असाच एक प्रकार मुंबईत घडल्याचं समोर आलं आहे. मुलूंड परिसरात एक करोनाबाधित रुग्ण सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे फिरत होता. याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेनं त्या रुग्णाचा ठिकाणा शोधून त्याला पुन्हा रुग्णालयात दाखलं केलं.

मिड-डेनं या घटनेसंदर्भातील वृत्त दिलं आहे. एक करोनाबाधित रुग्ण सर्रासपणे रस्त्यांवर फिरत असल्याचं बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यावरून महापालिकेनं कारवाई करत त्या व्यक्तीचा ठिकाणा शोधला. त्यानंतर त्या व्यक्तीला मिठाघर येथील कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आलं.

या घटनेची महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. “सीताराम कांबळे असं त्या करोनाबाधित रुग्णाचं नावं आहे. ते मानसिक आजारातून जात आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये असताना कांबळे यांनी डॉक्टर आणि नर्सना त्रास दिला होता. आता आम्ही मानसिक आजाराच्या समस्या असलेल्या करोनाबाधित रुग्णांसाठी एक कोविड सेंटर सुरू केलं आहे. हे नवीन कोविड सेंटर नायर रुग्णालयात असेल, जिथे कांबळे यांना लवकरच हलवण्यात येणार आहे,” असं मनपा अधिकाऱ्यांनी सांगितलं.

“कांबळे हे मानसिक आजाराने त्रस्त आहेत. मुलूंडच्या कोविड सेंटरमध्ये असताना त्यांमुळे डॉक्टर, नर्ससह इतर रुग्णांनाही त्रास झाला. कर्मचाऱ्याच्या वस्तू घेतल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. मुंबईमध्ये मानसिक आजाराचा सामना करत असलेल्या रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर नाहीयेत. त्यामुळे विशेष वार्ड सुरू करण्याचा निर्णय या केसमुळे घेण्यात आला आहे,” अशी माहिती महापालिकेचे सहायक आयुक्त किशोर गांधी यांनी दिली.

“अशा रुग्णांची देखरेख करण्यासाठी विशेष डॉक्टरांची गरज आहे. असे डॉक्टर नायर रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यामुळे कांबळे यांना पुढील दोन तीन दिवसांत नायर रुग्णालयात दाखल करण्यात येईल,” असंही गांधी यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 2:23 pm

Web Title: mumbai bmc readmits covid 19 patient found roaming bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 प्रियदर्शन जाधव, सविता मालपेकर यांसह दिग्गज कलाकारांनी हाती घेतला राष्ट्रवादीचा झेंडा
2 विलगीकरणासाठी घेतलेल्या घरांच्या कर्जाचे हप्ते सरकारने भरावे
3 मुंबई विद्यापीठाने २०१९-२० अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत काढले परिपत्रक
Just Now!
X