22 September 2020

News Flash

‘न खाऊँगा ना खाने दूँगा’ म्हणत निरुपम यांनी ट्विट केला मोदींचा फोटो आणि…

हा फोटो फोटोशॉप केलेला असल्याचं अनेकांनी त्यांना ट्विट करून सांगितलं

निरुपम यांनी ट्विट केलेला फोटो

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी ट्विट केलेल्या फोटोवरुन नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो निरुपम यांनी काल रात्री उशीरा ट्विट केला. या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चमचाने खाणं खाताना दिसत आहेत. मोदींसमोरील टेबलवर अनेक पदार्थ ठेवलेले या फोटोमध्ये दिसत आहे. निरुपम यांनी या फोटोला ‘न खाऊँगा ना खाने दूँगा!’, अशी कॅप्शन दिली आहे. हा फोटो फोटोशॉप केलेला असल्याचं अनेकांनी त्यांना ट्विट करून सांगितलं. या फोटोला रिट्विटपेक्षा कमेन्टच जास्त आल्या आहेत.

हा फोटो फोटोशॉप असल्याचे अनेकांनी या फोटोवर कमेन्ट करुन निरुपम यांना सांगितले. अनेकांना पंतप्रधानांचा हा असला एडिटींग केलेला फोटो रुचला नाही. त्यामुळेच नंतर निरुपम यांनी ट्विटवरून हा फोटो फोटोशॉप असल्याचे आपल्याला ठाऊक असल्याचे स्पष्ट केले. स्पष्टीकरण देताना केलेल्या ट्विटमध्ये संजय निरुपम म्हणाले की, ‘मित्रांनो, हा फोटो फोटोशॉप केलेला आहे हे मला ठाऊक आहे. आणि मला ठाऊक आहे मोदीजी एवढं खातं नाही. हा एक विनोद आहे. सर्वच गोष्टींना इतका गंभीर्याने पाहू नका.’ या सल्ल्याबरोबरच स्पष्टीकरणाच्या ट्विटमध्येही त्यांनी मोदींना शेवटच्या ओळीत शाब्दिक चिमटा काढलाच. मोदी खातात पण इतकं नाही असंही ते शेवटच्या ओळीत म्हणाले.

रात्री साडेअकराला ट्विट केलेल्या मोदींच्या एडिटेड फोटोवरून अनेकांनी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षांना असा खोटा फोटो ट्विट करणे शोभत नसल्याचे मत या ट्विटवर नोंदवले. तर काही काँग्रेस समर्थकांनी पंतप्रधान इतके खोटे बोलतात त्याबद्दल कोणी शब्द काढत नाही असा आरोप भाजप समर्थकांवर केला. या फोटोखालील कमेन्टमध्ये भाजप समर्थक विरुद्ध काँग्रेस समर्थक यांचे शाब्दिक युद्ध चांगलेच रंगले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2018 3:25 pm

Web Title: mumbai congress chief sanjay nirupam tweets photoshopped picture of modi
Next Stories
1 भाजपा- राष्ट्रवादीत ट्विटर वॉर, राष्ट्रवादीची टिक-टिक कृत्रिम असल्याची टीका
2 अबब ! रेल्वे प्रवाशाकडे सापडलं १७ किलो सोनं
3 मुंबई महापालिकेने २८१ गणेश मंडळांना नाकारली परवानगी
Just Now!
X