मुंबई विमानतळाच्या इमारतीमध्ये मंगळवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली आहे. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून टर्मिनलमधील दुसऱ्या मजल्यावरील संगणक कक्षात आग लागल्याचे प्राथमिक वृत्त हाती आले आहे.

मुंबई विमानतळावरील टर्मिनल बिल्डिगच्या दुसऱ्या मजल्यावर दुपारी आग लागली. धूरामुळे विमानतळ परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले. शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे. टर्मिनलमधील दुसऱ्या मजल्यावर संगणक कक्ष असून तिथेच आग लागली होती असे समजते. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.