News Flash

मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

रूळ, ओव्हरहेड वायर यांसह अन्य तांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक

मुंबई लोकलच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्ही मार्गावर आज(दि.२३) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रूळ, ओव्हरहेड वायर यांसह अन्य तांत्रिक कामांसाठी हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे लोकल गाडय़ा उशिराने धावतील.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप धिम्या मार्गावर, कुर्ला ते वाशी दोन्ही मार्ग आणि पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते भाईंदर दोन्ही जलद मार्गावर ब्लॉक असेल. यात हार्बरवरील लोकल सेवा पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वे-मुख्य मार्ग

  • कुठे- मुलुंड ते माटुंगा अप धिम्या मार्ग
  • कधी- रविवार, २३ डिसेंबर, स. ११.१० ते दु. ३.४०
  • परिणाम- ब्लॉकमुळे मुलुंड ते माटुंगादरम्यान अप धिम्या

मार्गावरील लोकल अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, सायन स्थानकात लोकल गाडय़ा थांबतील. माटुंगानंतर पुन्हा अप धिम्या मार्गावर लोकल धावतील. कल्याणहून सुटणाऱ्या जलद व अर्धजलद लोकल गाडय़ांनाही दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. मुख्य मार्गावरील लोकल गाडय़ा दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर मार्ग
  • कुठे- कुर्ला ते वाशी अप-डाऊन मार्ग
  • कधी- रविवार, २३ डिसेंबर, स. ११.१० ते दु. ३.४० वा.
  • परिणाम- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी, बेलापूर, पनवेलदरम्यानच्या अप-डाऊन मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलदरम्यान विशेष लोकल धावतील.

पश्चिम रेल्वे

  • कुठे- बोरिवली ते भाईंदर अप व डाऊन जलद मार्ग
  • कधी- रविवार, २३ डिसेंबर, स. ११ ते दु. ३.००
  • परिणाम- ब्लॉकमुळे विरार, वसई ते बोरिवली अप व डाऊन जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर धावणार आहेत. पश्चिम रेल्वेवरील लोकल दहा मिनिटे उशिराने धावतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2018 8:47 am

Web Title: mumbai local central harbour western line mega block
Next Stories
1 शासकीय डॉक्टरांच्या दुकानदारीला चाप!
2 राफेलप्रकरणी राहुल गांधींचा खोटारडेपणा उघड
3 वाहनतळ व्यवस्थेसाठी पालिकेची सोसायटय़ांना साद!
Just Now!
X