News Flash

Mumbai plane crash, VIDEO : कोसळलेले चार्टर्ड विमान CCTV मधे कैद

काळजाचा थरकाप उडवणारी दृश्ये

या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला.

घाटकोपरमधील माणिकलाल परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या आवारात चार्टर्ड विमान कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून हे विमान यू वाय अॅव्हिएशन या कंपनीचे होते. हे विमान कोसळतानाचे सीसीटीव्ही फुटेज लोकसत्ता.कॉमच्या हाती आले आहे. शेजारी असलेल्या इमारतीत जो सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला आहे. त्याच कॅमेरातील सीसीटीव्हीची ही दृश्ये समोर आली आहेत. काही सेकंदांचा हा व्हिडिओ हृदयाचा थरकाप उडवणारा आहे.

पाहा व्हिडिओ

 

विमान अपघात झाल्यावर अग्निशमन दल आणि आपातकालीन पथक घटनास्थळी पोहोचले असून घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. वैमानिक मारिया झुबेर, सहवैमानिक प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी आणि मनीष पांडे या चार जणांचा मृत्यू झाला. तर पादचारी गोविंद पंडित यांचाही दुर्दैवी अंत झाला. अशात लोकसत्ता. कॉमच्या हाती या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आले आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2018 6:22 pm

Web Title: mumbai plane crash video cctv footage
Next Stories
1 Mumbai Plane Crash: मुख्यमंत्र्यांनी केली घटनास्थळाची पाहणी, कठोर कारवाईचं आश्वासन
2 Mumbai plane crash : मुख्यमंत्री अपघातस्थळी दाखल; मृतांना योग्य मोबदला देणार
3 Mumbai plane crash: वैमानिकांना होता ५ हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव
Just Now!
X