News Flash

“साहेब तो व्हिडीओ जुना आहे…” पोलिसांच्या उत्तरानंतर किरीट सोमय्यांनी टि्वट केले डिलीट!

खात्री करुन घेतल्याशिवाय माहिती शेअर न करण्यासंदर्भात पोलिसांचं आवाहन

मुंबईमधील करोनाग्रस्तांचा आकडा दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या हे ट्विटरवरुन याचसंदर्भात वारंवार राज्यातील महाविकास आघाडीला प्रश्न करताना दिसत आहे. शीवमधील रुग्णालयातील व्हिडिओ असो किंवा एखाद्या घटनेवरील प्रतिक्रिया असो सोमय्या हे ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात. मात्र सोमय्या यांनी नुकताच पोस्ट केलेला एक व्हिडिओ चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण थेट मुंबई पोलिसांनी दिलं आहे. पोलिसांसंदर्भातील व्हिडिओ हा जुना असल्याचे थेट पोलिसांनी सांगितल्यानंतर सोमय्या यांनी ट्विट डिलीट केलं आहे.

काय होतं व्हिडिओमध्ये आणि किरीट सोमय्यांनी काय ट्विट केलं होतं?

सोमय्या यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला पोलीस अधिकारी गाडीची वाट पाहता उभी असल्याचे दिसत होतं. या महिलेला कोरोनामुळे श्वास घेण्यास अडचण येत होती. तरीही तिला बराच वेळ रुग्णवाहिकेसाठी वाट पाहत उभे राहावे लागले, असे सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

पोलिसांनी काय उत्तर दिलं?

सोमय्या यांनी केलेला दावा चुकीचा असल्याचे मुंबई पोलिसांनी ट्विटवरुन स्पष्ट केलं आहे. “तुम्ही आमची काळजी करता याबद्दल बरं वाटलं मात्र हा व्हिडिओ १६ मे २०२० चा असून तो करोनाशी संबंधित नाहीय. ही महिला करोनायोद्धा अगदी ठणठणीत असून ती करोनाग्रस्त नाहीय. आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की माहितीची खात्री करुन घेतल्याशिवाय ती शेअर करु नये,” असं मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  

आदित्य ठाकरेंना आवडला रिप्लाय

पोलिसांनी सोमय्या यांच्या ट्विटला दिलेला रिप्लाय आदित्य ठाकरेंनाही लाइक केला आहे. त्यांनी लाइक केलेल्या ट्विटच्या यादीमध्ये मुंबई पोलिसांचे हे ट्विट दिसत आहे.

थेट पोलिसांनी व्हिडिओ आणि त्याच्यासोबत शेअर करण्यात आलेली माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट केल्यानंतर सोमय्या यांनी मुख्य ट्विट डिलीट केलं आहे. मात्र पोलिसांच्या रिप्लायमध्ये https://twitter.com/kiritsomaiya/ या युआरएलवरुन ट्विट हे सोमय्या यांच्या अकाउंटवरुन करण्यात आल्याचे स्पष्ट होतं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2020 2:51 pm

Web Title: mumbai police replied to kirit somaiyas tweet saying this is old video bjp leader deletes the tweet scsg 91
Next Stories
1 अशोक चव्हाणांना उपचारासाठी मुंबईला हलवलं, १२ तास रस्त्याने प्रवास करुन पोहोचणार
2 …म्हणून शरद पवारांनी घेतली राज्यपालांची भेट
3 करोनाचा सामना करण्यासाठी पालिका रुग्णसेवा आता गतिमान!
Just Now!
X