मुंबईसह उपगनरांमध्ये पाऊस पडू लागल्याने त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. एकीकडे मध्य रेल्वेची सेवा उशिराने सुरु आहे. तर ट्रान्स हार्बर लोकलसेवाही विस्कळीत झाली आहे. तर कल्याण, भिवंडी, लालबाग, परळ, माटुंगा, सायन या भागात पावसाच्या सरी कोसळल्या. दहीसर, बोरीवली, प्रभादेवी भागातही पावसाच्या सरी कोसळल्या.

मध्य रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली आहे. माटुंगा स्थानकाजवळ सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसंच पाऊसही मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.