सध्या मुंबईकर भर दुपारीही कुडकुडणाऱ्या थंडीचा अनुभव घेत आहेत. प्रत्यक्षात रात्रीच्या तापमानात घट झालेली नसतानाही दुपारी सुटलेल्या थंडगार वाऱ्यांमुळे शहरात गारठा वाढल्यासारखे वाटत आहे. ढगाळ वातावरण व राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत असताना मुंबईतील किमान तापमान स्थिर असून कमाल तापमानात मात्र चार अंश से. घट झाली आहे. ढगाळ वातावरण आणि दिवसा सुटणारे थंड वारे यांचा प्रभाव पुढील दोन दिवसही कायम राहणार आहे, असा अंदाज वेधशाळेचा आहे. या दिवसात किमान तापमानात फार चढ-उतार होणार नाहीत.