मुंबई : मुंबई किं वा अन्य शहरांमधील भ्रमध्वनीची  दुकाने फोडून हाती लागणारा सर्व ऐवज नेपाळमध्ये विकणारी उत्तर प्रदेशातील टोळी वडाळा टीटी पोलिसांनी गजांआड के ली. एरव्ही अशा गुन्ह्यांची उकल करताना पोलिसांना तांत्रिक दुव्यांची बरीच मदत होते. मात्र या प्रकरणात कोणताही दुवा नसताना निव्वळ खबऱ्यांच्या जोरावर नेपाळ सीमेवरील बेहराईच गावात पोलीस पथकाने कारवाई के ली. अस्लम खान उर्फ सिराज, हारूण तेली आणि महोम्मद इम्रान नजीर खान उर्फ डबला अशी अटक के लेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिघेही बेहराईचचे रहिवासी आहेत.

मुंबई किं वा महानगरांमधील भ्रमणध्वनींची दुकाने हेरून ती फोडायची.  भ्रमणध्वनीसह हाती लागणारी अन्य उपकरणे बेहराईच येथे आणायची. काही दिवसांनी ती नेपाळमध्ये स्वस्तात विकायची, अशी या टोळीची कार्यपद्धती होती. या टोळीने वडाळ्यायातील संगमनगर येथील भ्रमणध्वनीचे दुकान फोडून सुमारे सात लाखांचा ऐवज लुटला होता. त्याआधी मुलुंड येथील उच्चभ्रू वसाहतीतील भ्रमणध्वनी शो रूम लक्ष्य के ले होते.

वरिष्ठ निरीक्षक शैलेश पासलवार यांच्या मार्गदर्शनाखालील सहायक निरीक्षक अजय बिराजदार, सहायक उपनिरीक्षक तांबडे, हवालदार भोसले, देशमख आणि पवार या पथकाने संगमनगर येथील भ्रमणध्नवी दुकानातील घरफोडीनंतर तपास सुरू के ला. नवे कोरे भ्रमणध्वनी चोरी झाल्याने तांत्रिक तपासाला मर्यादा होत्या.

सीसीटीव्ही चित्रणातही आरोपी स्पष्ट दिसत नव्हते किंवा त्यांची ओळख पटवणे शक्य नव्हते. मात्र या दुकानाजवळच व्यवसाय कररणाऱ्या फे रीवाल्याने दिलेल्या माहितीचा अचूक वापर करून पथकाने आरोपींचा माग काढला. या फे रीवाल्याने दुकानाजवळ विनाकारण घुटमळणाऱ्या एका तरुणाचे वर्णन पोलिसांना सांगितले.

त्याआधारे पासलवार, बिराजदार यांनी आपल्या खबऱ्यांना सतर्क करून अधिक माहिती गोळा के ली. त्यापैकी एका खबऱ्याने हे वर्णन नेपाळ सीमेवर राहणाऱ्या इम्रानशी मिळते जुळते असल्याचा दावा के ला. इम्रानला अशाचप्रकारची गुन्हेगारी पाश्र्वाभुमी असल्याचे लक्षात येताच पथकाने गती वाढवून बेहराईच गाठले. तेव्हा तिन्ही आरोपी चोरी के लेला ऐवज विकण्यासाठी नेपाळला जाण्याच्या तयारीत होते. तिघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्हा कबूल के ला, असे पासलवार यांनी सांगितले.