News Flash

मुंबई विद्यापीठाचा ७२४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प

विद्यापीठ डिजिटल करण्यावर भर; गेल्यावर्षीच्या तुलनेत तरतुदींमध्ये घट

करोना कालावधीतील अनुभवांतून शहाणे होत मुंबई विद्यापीठाने डिजिटलायझेशन आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर या अर्थसंकल्पात भर दिला आहे. विद्यापीठाचा २०२१-२२ चा ७२४ कोटी रुपये तरतुदींचा आणि ७८ कोटी ५३ लाख रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प शनिवारी रात्री अधिसभे समोर सादर करण्यात आला.

विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा घट झाली आहे. करोनामुळे यंदा विद्यापीठाचे उत्पन्न आणि तरतुदींमध्ये घट झाल्याचे विद्यापीठाने नमूद केले आहे. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिसभेत प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ. (सीए.) प्रदीप कामथेकर यांनी अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात १ कोटी रुपयांची तरतूद विद्यापीठाच्या डिजिटलायझेशनसाठी करण्यात आली आहे. याशिवाय विद्यापीठातील विकास कामे, विद्याथ्र्यांसाठी शिष्यवृत्तीची तरतूद करण्यात आली आहे.

विद्यापीठ उपकेंद्रातील पायाभूत सुविधा, अपंग विद्याथ्र्यांयोग्य परिसराची निर्मिती, शैक्षणिक सुविधा, स्व. बाळासाहेब ठाकरे कला आणि सांस्कृतिक केंद्र, विद्यापीठ परिसराचे सुशोभिकरण, सिंधुदुर्ग उपकेंद्र, इन्क्युबेशन सेंटर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान, क्रीडा संकुलाची स्थापना, सागरी संशोधन केंद्र, दुर्गम भागांतील अनुसूचित जमातीच्या विद्याथ्र्यांसाठी शिष्यवृत्ती, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७५व्या सोहळ्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रम, विद्यापीठ मुद्रणालयाचे सक्षमीकरण, मागासवर्गीय विद्याथ्र्यांना आर्थिक सहाय्य, ललित कला केंद्र, आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना, लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र, अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र, भाषाभ्यास केंद्र यासाठी विशेष तरतुद करण्यात आली आहे.

तरतुदी किती

 • अपंग विद्याथ्र्यांयोग्य शैक्षणिक परिसर – २२ कोटी ५० लाख
 • स्व. बाळासाहेब ठाकरे कला आणि सांस्कृतिक केंद्र – ९ कोटी
 • विद्यापीठ परिसराचे सुशोभीकरण – ५ कोटी
 • सिंधुदुर्ग उपकेंद्र – ३ कोटी
 • इन्क्युबेशन सेंटर – २.५० कोटी
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र – २ कोटी
 • डिजीटल लायब्ररी – २ कोटी
 • डिजीटल युनिव्हर्सिटी – १ कोटी
 • शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वसाहत – १ कोटी
 • क्रीडा संकुलाची स्थापना – १ कोटी. विद्यापीठ परिसर विकास – १ कोटी. पालघर उपकेंद्र – १ कोटी
 • सागरी संशोधन केंद्र – ८० लाख
 • दूर्गम भागातील अनुसूचित जमातीतील विद्याथ्र्यांसाठी

शिष्यवृत्ती – ७० लाख

बांधकाम पूर्ण करण्यास प्राधान्य

नियोजित बांधकामे पूर्ण करण्यासाठी यंदा भरीव तरतूद करण्यात आली आहे. हिंदी व उर्दू भाषा भवन, क्रीडा संकुल, बाबू जगजीवनराम मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह, कर्मचारी निवास, सभागृह, तत्त्वज्ञान केंद्र, प्रा. बाळ आपटे दालन, भाषा भवनाच्या इमारत दुसरा टप्पा, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह दुसरा टप्पा यांसाठी तरतूद करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2021 12:41 am

Web Title: mumbai university has a budget of rs 724 crore abn 97
Next Stories
1 सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ
2 औषधनिर्माणशास्त्र, वास्तूकला अभ्यासक्रम ‘एआयसीटीई’च्या अखत्यारीतून वगळले
3 उन्हाचे चटके तीव्र
Just Now!
X