हुतात्मा चौकाजवळ स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचं हेडक्वार्टर ही एक ब्रिटिशकालीन महत्त्वाची वास्तू आहे. ही इमारत बांधली त्यावेळी स्टँडर्ड चार्टर्ड बँक नव्हती. स्टँडर्ड व चार्टर्ड बँकेच्या एकत्रीकरणातून ही नवी बँक उदयाला आली. चार्टर्ड म्हणजे त्यावेळी बँक होती चार्टर्ड बँक ऑफ इंडिया, ऑस्ट्रेलिया अँड चायना. या इमारतीच्या छपरावर तुम्हाला एक पुतळा दिसेल. एक देवी आहे नी तिच्या पायाशी तीन दासी आहेत. ब्रिटनचं भाग्य ठरवणारी देवी आहे ब्रिटानिया. आणि पायाशी तीन दासी आहेत, त्या आहेत भारत, ऑस्ट्रेलिया व चायना. या इमारतीची माहिती सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

‘गोष्ट मुंबईची’ ही व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी  येथे क्लिक करा.