उपनगरात भांडूप येथे गुरुवारी दुपारी एका १७ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याची तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या करण्यात आली. सुशील वर्मा असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. सुशीलने शाळे बाहेर पाऊल ठेवताच त्याच्यावर हल्ला करण्यात आला.
हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळयात कोसळलेल्या सुशीलला लगेचच जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एका मुलीवरुन झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
तिघांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले असून काही अल्पवयीन मुले देखील यामध्ये सहभागी असू शकतात असे पोलिसांनी सांगितले. हत्येच्या कलम ३०२ अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 26, 2018 9:30 pm