सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील कुडाळ विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांनी यापुढे विधानसभा निवडणूक न लढविण्याची घोषणा केली असतानाही, काँग्रेसने त्यांच्यासमोर ‘मातोश्री’च्या अंगणातून लढविण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. परंतु ही पोटनिवडणूक लढविण्यास राणे फारसे उत्सुक नाहीत, असे समजते. मात्र पक्षाचा प्रस्ताव झुगारून आपली नाराजी कायम असल्याचे संकेत द्यावयाचे, की चालून आलेल्या आणखी एका संधीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावयाचा, असा पेच राणे यांच्यासमोर आहे.
प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण तर मुंबईच्या अध्यक्षपदी संजय निरुपम यांच्या निवडीवरून पक्षाच्या विरोधात तोफ डागणाऱ्या नारायण राणे यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणूक लढवावी, असा प्रस्ताव काँग्रेसने दिला आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश बाळा सावंत यांच्या निधनाने रिक्त झालेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात पुढील महिन्यात पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघातून राणे यांना उमेदवारी देण्याची तयारी काँग्रेसने दर्शविली आहे. पक्षाचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राणे यांच्यापुढे हा प्रस्ताव मांडला आहे. शिवसेनेच्या विरोधात लढण्यासाठी पक्षनेतृत्वाने राणे यांना पुढे केले आहे. गेल्याच आठवडय़ात राणे यांनी बंडाचे निशाण फडकविले होते. अर्थात आधीच्या बंडांप्रमाणे राणे यांचे हेही बंड थंडावेल, अशी चिन्हे आहेत.
 मोहन प्रकाश यांनी आपल्याकडे हा प्रस्ताव मांडला आहे. पण मी काही ही पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलेला नाही, असे राणे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. कोकणातील पराभवामुळे राणे खचले होते. पुन्हा पोटनिवडणूक लढणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान असेल. सध्या काँग्रेसला वातावरण तेवढे अनुकूल नाही. ही सारी परिस्थिती लक्षात घेता राणे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेशी दोन हात करण्याची शक्यता दिसत नाही.
पोटनिवडणुकीत पराभव झाल्यास पुढील वर्षी विधान परिषदेची आमदारकी द्यावी, अशी राणे यांची अट असल्याचे काँग्रेसच्या वर्तुळातून सांगण्यात येते. राणे यांनी मात्र अशी कोणतीही अट आपण घातलेली नाही, असे स्पष्ट केले. पोटनिवडणूक लढवावी, असा प्रस्ताव काँग्रेसने दिला आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश बाळा सावंत यांच्या निधनाने रिक्त झालेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात पुढील महिन्यात पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघातून राणे यांना उमेदवारी देण्याची तयारी काँग्रेसने दर्शविली आहे. पक्षाचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राणे यांच्यापुढे हा प्रस्ताव मांडला आहे. शिवसेनेच्या विरोधात लढण्यासाठी पक्षनेतृत्वाने राणे यांना पुढे केले आहे. गेल्याच आठवडय़ात राणे यांनी बंडाचे निशाण फडकविले होते. अर्थात राणे यांचे हेही बंड थंडावेल, अशी चिन्हे आहेत. मोहन प्रकाश यांनी आपल्याकडे हा प्रस्ताव मांडला आहे. पण मी काही ही पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलेला नाही, असे राणे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. कोकणातील पराभवामुळे राणे खचले होते. पुन्हा पोटनिवडणूक लढणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान असेल. सध्या काँग्रेसला वातावरण तेवढे अनुकूल नाही. ही सारी परिस्थिती लक्षात घेता राणे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेशी दोन हात करण्याची शक्यता दिसत नाही. पोटनिवडणुकीत पराभव झाल्यास पुढील वर्षी विधान परिषदेची आमदारकी द्यावी, अशी राणे यांची अट असल्याचे काँग्रेसच्या वर्तुळातून सांगण्यात येते.