30 September 2020

News Flash

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंधुरे कोण आहे ?

मागच्या पाच वर्षांपासून डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा चाचपडत तपास सुरु होता. ठोस काही हाती लागत नव्हते. पण आता या संपूर्ण कटाचा उलगडा होण्याची आशा

संग्रहित छायाचित्र

मागच्या पाच वर्षांपासून डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा चाचपडत तपास सुरु होता. ठोस काही हाती लागत नव्हते. पण आता औरंगाबाद येथे राहणाऱ्या सचिन प्रकाशराव अंधुरेच्या अटकेमुळे या संपूर्ण कटाचा उलगडा होण्याची आशा निर्माण झाली आहे. सीबीआयने अटक केलेला सचिन अंधुरेच मुख्य मारेकरी असल्याचे सांगण्यात येत आहे. २० ऑगस्ट २०१३ रोजी नरेंद्र दाभोलकर पुण्यात असताना मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी सकाळी आठ ते साडे आठ दरम्यान त्यांची गोळया झाडून हत्या करण्यात आली होती. सचिन अंधुरेनेच या गोळया झाडल्याचे तपास यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे.

हा सचिन अंधुरे आहे कोण
– नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटकेत असलेल्या शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंधुरेचे नाव समोर आले.
– सचिन आणि शरद दोघे मित्र आहेत.
– सचिन अंधुरे औरंगाबादमधील कुंवारफल्ली राजाबाजार येथे राहतो.
– निराला बाजार येथे एका कपडयाच्या दुकानात तो कामाला आहे.
– पत्नी, भाऊ आणि एक वर्षाची मुलगी असा त्याचा परिवार आहे.
– मे महिन्यात औरंगाबादमध्ये झालेल्या दंगलीत त्याचा सहभाग असल्याची माहिती मिळाली आहे.
– सचिनच्या फेसबुक अकांऊटवरुन तो हिंदुत्ववादी विचारसरणीचा असल्याचे स्पष्ट झाले.
– सचिन अंधुरे, शरद कळसकर यांचा सनातन, हिंदू जनजागृतीशी संबंध आहे किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

काय आहे नालासोपारा स्फोटक प्रकरण
११ ऑगस्ट रोजी राज्य दहशतवादविरोधी पथकाने नालासोपाऱ्यात राहणाऱ्या वैभव राऊत (वय ४०) या तरुणाच्या घरावर धाड टाकून २० गावठी बॉम्ब, स्फोटके आणि बॉम्ब बनविण्याचे साहित्यही हस्तगत केले. नालासोपारा आणि पुण्यातून तीन संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांना अटक केली. र खबऱ्याने दिलेली माहिती, मोबाइल क्रमांक याआधारे गेल्या दोन आठवडय़ांपासून या तिघावर पोलिसांची बारीक नजर होती. काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागताच ही कारवाई केली गेली. सोपारा गावातील भंडार आळीतील दोन मजली घरापासून काही अंतरावर असलेल्या ‘साई दर्शन’ या इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानात हे बॉम्ब ठेवले होते. अटक करण्यात आलेल्या वैभव राऊत, शरद काळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या तिघांकडे अधिक चौकशी करण्यात आली. त्यानंतर आणखी माहिती समोर आली त्यानुसार, आणखी काही ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2018 11:04 pm

Web Title: narendra dabholka murder case sachin andure
टॅग Narendra Dabholkar
Next Stories
1 जातीय तेढ प्रकरणी MIM नगरसेवक अटकेत, भाजपाच्या ५ नगरसेवकांवरही गुन्हा
2 अभियांत्रिकीतील एका विषयाचा अभ्यासक्रम मराठीत
3 राज्यातील शैक्षणिक उणिवांवर केंद्राचे बोट!
Just Now!
X