‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’ने ज्येष्ठ लेखक प्रा. विलास खोले यांचा ‘नाटक आणि रंगभूमी परिभाषा संग्रह’ बुधवारी पुण्यात प्रकाशित केला. नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन झाले. खोले यांची एकहाती निर्मिती असलेल्या या संग्रहात पावणेतीनशे नोंदी आहेत. संस्कृत आणि पाश्चात्त्य नाटय़शास्त्राचा आधार घेत ‘नाटक‘ या संकल्पनेचे आणि नाटय़प्रकारांचे ऐतिहासिक आणि विश्लेषणात्मक विवेचन करण्यात आले आहे.

प्रा. खोले हे मुंबईच्या ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठा’च्या मराठी विभागाचे प्रमुख आणि पुण्याच्या ‘पदव्युत्तर अध्ययन व संशोधन विभागा’चे प्रशासकीय समन्वयक म्हणून निवृत्त झाले आहेत. आवश्यक असणारे साहित्य त्यांना अमेरिकेतील काही विद्यापीठांतून उपलब्ध झाले. तसेच बडोदा विद्यापीठातून भरतमुनींच्या नाटय़शास्त्राच्या चार खंडांच्या मूळ प्रती मिळवून त्यांनी अभ्यास के ला. या संग्रहात लावणी, पोवाडा, इत्यादी लोकनाटय़े, दूरदर्शन नाटक, संगीत नाटक, मेलोड्रामा, शोकांतिका (ट्रॅजेडी), सुखांतिका (कॉमेडी), प्रहसन (फार्स), उपहासिता (सटायर) इत्यादी नाटय़प्रकारांबाबतच्या नोंदी आहेत.

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार

व्याख्या, स्वरूप, घटक अशा मुद्दय़ांच्या आधारे विविध नाटय़प्रकारांशी संबंधित घटकांचे विश्लेषण करण्यात आले आहे. संस्कृत नाटय़शास्त्र, पाश्चात्त्य नाटय़शास्त्र, नाटय़प्रकार आणि मराठी नाटक अशी चार प्रकरणे यात हाताळण्यात आली आहेत. ‘नाटकाविषयी बरेच लेखन झाले आहे. पण पाश्चात्त्य संदर्भाने नाटकाचे विश्लेषण येण्याची ही पहिलीच वेळ आहे’, अशी माहिती प्रा. खोले यांनी दिली. ८२६ पृष्ठसंख्येच्या या संग्रहाचे मूल्य २६३ रुपये आहे.