आपल्या विविध सेवांबाबत जनजागृती करण्यासाठी भारतीय टपाल विभागातर्फे ९ ते १५ ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्राहकांना नव्या सेवा-सुविधा उपलब्ध करण्याबाबत यावेळी घोषणा करण्यात येणार आहे.

युनिव्हर्सल पोस्टल युनियनची ९ ऑक्टोबर १८७४ रोजी स्थापना झाली. त्यामुळे १९६९ पासून हा दिवस जागतिक टपाल दिवस साजरा केला जातो. भारतीय टपाल विभागही याच दिवशी जागतिक टपाल दिवस साजरा करणार असून त्याचे पुढचे काही दिवस हे राष्ट्रीय सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील सर्वसाधारण टपाल कार्यालयातील संचालक हरीश अग्रवाल यांनी दिली.

Metro 1 route soon to MMRDA Bankruptcy petition against MMOPL disposed
मेट्रो १ मार्गिका लवकरच एमएमआरडीएकडे, ‘एमएमओपीएल’विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली
Organizing an international conference on Dr Babasaheb Ambedkar in london
लंडनमध्ये आज आंतरराष्ट्रीय परिषद; शाश्वत, सर्वसमावेशक विकास आणि डॉ. आंबेडकर
what is nato and its purpose
नाटोची ७५ वर्ष; ही संघटना का स्थापन करण्यात आली? तिला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतोय?
LSG Pacer Mayank Yadav
IPL 2024 : मयंक यादवने दिल्लीसाठी नाकारली होती सर्विसेजची ऑफर, ऋषभ पंतच्या कोचच्या मदतीने बनला ‘राजधानी एक्सप्रेस’

महाराष्ट्र टपाल श्रेत्रातील मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि गोवा या पाच श्रेत्रात हा सप्ताह साजरा होणार आहे.

विभागाकडून विविध सेवा दिल्या जात आहेत. तसेच  तक्रार निवारणासाठी १९२४ हा करमुक्त आणि व्हाट्सअप क्रमांक विभागाकडून ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला असून ट्विटरवरही अधिकृत खाते तयार करण्यात आले आहे. एकूणच ग्राहकांच्या संख्येत भर घालण्यासाठी आणि ग्राहकांच्या सोयी-सुविधांसाठी विभाग पुरेपूर प्रयत्न करत आहे, असे हरीश अग्रवाल यांनी सांगितले.

शिवाय गेल्या दोन वर्षांत विभागाच्या उत्पनात वाढ झाली असून जलद टपाल, पार्सल सेवा, बिझनेस टपाल यांसारख्या सुविधांमुळे उत्पनात वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय डाक सप्ताह समारोह २०१६

  • ९ ऑक्टोबर – जागतिक डाक दिवस
  • १० ऑक्टोबर – बचत बँक दिवस
  • १३ ऑक्टोबर – मेल दिवस
  • १४ ऑक्टोबर – डाक जीवन विमा दिवस
  • १५ ऑक्टोबर – व्यवसाय विकास दिवस

एटीएम सुरु करणार

विभागाअंतर्गत येणारे बचत खाते ग्राहकांच्या सोयीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात ७४ तर मुंबईत ३० स्वयंचलित एटीएम मशिन उभारण्यात आल्या असून त्यामुळे ग्राहकांना पोस्ट कार्यालयात न जाता पसे काढणे सोयीचे ठरणार आहे. तसेच युनिव्हर्सल पोस्टल युनियनने दिलेल्या निधीतून वितरणाला गती प्राप्त होण्यासाठी ३५ पार्सल वाहक वाहनांची खरेदी विभागाने केली आहे. आंतरराष्ट्रीय टपाल सुविधांच्या सुधारणेसाठीही विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.