नवी मुंबईत घर खरेदी करताना किंवा इमारतीचा पुनर्विकास करताना आता सिडकोची परवानगी घ्यावी लागणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा  महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

मंगळवारी सिडकोचे एमडी, कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील जमिनीवरील ताबा सोडा असे निर्देश सिडकोला दिले. या निर्णयामुळे नवी मुंबईतील ५ लाख नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता नवी मुंबईतील ३४४ चौरस किलोमीटर जमीन आता फ्री होल्ड होणार आहे. म्हणजेच ही जमीन आता सिडकोच्या ताब्यात राहणार नाही. आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नवी मुंबईकरांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या निर्णयामुळे आता नवी मुंबईकरांना घर विकताना किंवा पुनर्विकास करताना सिडकोची परवानगी तसेच हस्तांतरण शुल्क भरावे लागणार नाही.