News Flash

‘माफ करा साहेब, पहिल्यांदाच तुमचं ऐकणार नाही;’ आव्हाडही ईडी कार्यालयावर धडकणार

शरद पवार आज दुपारी 2 वाजता ईडी कार्यालयात पोहचणार आहेत.

आज दुपारी दोनच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे मुंबईतील ईडीच्या कार्यालयात येणार आहेत. त्यामुळे ईडीसमोरच मोठा पेच निर्माण झाला आहे. तसंच “मी शुक्रवारी दुपारी २ वाजता ‘ईडी’ कार्यालयात उपस्थित राहणार आहे. मात्र, पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांनी या कार्यालयाबाहेर उपस्थित राहू नये. राज्यघटना आणि संस्थांचा आदर करण्याची आपली परंपरा कायम राखत पोलीस आणि शासकीय यंत्रणांना सहकार्य करावं,” असेही पवारांनी म्हटलं आहे. यानंतरही राष्ट्रवादी कांग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपण ईडी कार्यालयावर येणार असल्याचं म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी यांदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. माफ करा, या वेळेस पहिल्यांदा आम्ही तुमचं नाही ऐकणार. तुमच्या महाराष्ट्र घडवताना च्या वेदना आम्ही बघितल्या आहेत. कर्क रोग, मांडीच्या हाडाचं ऑपरेशन, पायाला झालेली इजा, तरी तुम्ही लढताय, वय वर्ष 79, हे सगळे तुम्ही आमच्यासाठी सोसलंय, उद्या साठी माफ करा. अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे. तसंच आव्हाड यांनी या ट्विटमध्ये शरद पवार यांनादेखील टॅग केलं आहे.

‘ईडी’च्या कार्यालयाबाहेर गर्दी करू नका : पवार
“पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानुसार, मी शुक्रवारी दुपारी २ वाजता ‘ईडी’ कार्यालयात उपस्थित राहणार आहे. मात्र, पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांनी या कार्यालयाबाहेर उपस्थित राहू नये,” असे आवाहन शरद पवार यांनी गुरुवारी ट्वीटद्वारे केले. राज्यघटना आणि संस्थांचा आदर करण्याची आपली परंपरा कायम राखत पोलीस आणि शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे, असेही पवारांनी म्हटले आहे.

दक्षिण मुंबईत काही ठिकाणी जमावबंदी
ईडीच्या कार्यालयात पोहोचणार आहे. परंतु ‘ईडी’ त्यांना कार्यालयात प्रवेश नाकारण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. तसंच खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी कुलाबा, कफ परेड, मरीन ड्राइव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे. मार्ग, एमआरए मार्ग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 8:11 am

Web Title: ncp leader mlc jitendra awhad will go to ed office tweet mp sharad pawar jud 87
Next Stories
1 ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तूर्तास तहकूब : शरद पवार
2 परवान्याचे वर्षभरात नूतनीकरण बंधनकारक
3 ‘आय.एन.एस. खांदेरी’ पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात लवकरच
Just Now!
X