मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर सोशल मीडियावर या निर्णयाच्या समर्थनार्थ तसेच विडंबन करणाऱ्या अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. राजकीय नेत्यांनीही हा निर्णय घेणाऱ्या मोदी सरकारला ‘चिमटे’ काढले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या नोटबंदीवर विडंबन केले आहे. या विडंबनाची पोस्ट त्यांनी फेसबुकवरही टाकली आहे. अशा प्रकारच्या अनेक पोस्ट त्यांनी ट्विटरवरही टाकल्या आहेत.

पाहा, जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट

मोदींनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सर्वसामान्य त्रस्त असली तरी, अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. पंतप्रधानांनी आपल्या अनेक कार्यक्रमांमध्ये संयम बाळगणाऱ्या जनतेचे कौतुक केले आहे. तसेच सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. अशातच मोदींनी घेतलेला हा निर्णय सर्वसामान्य जनतेवर केलेला सर्जिकल स्ट्राईक आहे. हा काळ्या पैशांवरील हल्ला नव्हे, अशी टीका विरोधी पक्षांचे नेते करत आहेत. काँग्रेससह अनेक पक्ष मोदींवर टीकास्त्र सोडत आहेत. पण पुण्यातील एका कार्यक्रमात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या निर्णयाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी कौतुकच केले आहे. पण दुसरीकडे पवार यांच्याच पक्षातील नेते मोदींवर टीका करत आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुकवर नोटबंदीचे विंडबन करणारी पोस्ट शेअर केली आहे.

आव्हाड यांनी ट्विटरवर अगदी फिल्मी स्टाइलमध्ये या निर्णयाचे विडंबन केले आहे. त्यासाठी त्यांनी ‘शोले’ या चित्रपटातील सांबा आणि गब्बरच्या प्रसिद्ध संवादाचा आधार घेतला आहे.