राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत. ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांना पाठिंबा दर्शवला होता. शरद पवार राजकारणातील भीष्म पीतमाह असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं होतं. तसंच महाराष्ट्राने अशा पद्धतीचं सूडाचं राजकारण पाहिलेलं नाही असं म्हणत त्यांनी शरद पवारांना पाठिंबा दर्शवला होता. शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब करताना समर्थन दिल्याबद्दल शिवसेनेचे आभार मानले आहेत.

तूर्तास चौकशीची गरज नाही, ईडीचा शरद पवारांना मेल
भाजपाकडून सूडभावनेने शरद पवारांना लक्ष्य – राहुल गांधी

संजय राऊत यांनी म्हटलं होतं की, “अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की, ज्या बँक घोटाळ्यावरुन ईडीने एफआयआर दाखल केला आहे, त्या बँकेत शरद पवार कोणत्याही पदावर नव्हते. तक्रारदाराने आपण कधीही शरद पवारांचं नाव घेतलं नसल्याचं म्हटलं आहे. अण्णा हजारे यांनीदेखील त्यांना क्लीन चीट दिली आहे”.

“महाराष्ट्राने याआधी सुडाचं राजकारण पाहिलं नाही”, शिवसेनेचं शरद पवारांना समर्थन

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवार आज ईडीच्या कार्यालयात जाणार होते. ईडीने कोणतीही नोटीस बजावली नसतानाही शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेणार होते. पण पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब केला. दरम्यान शरद पवार आता पूरग्रस्तांची विचारपूस करण्यासाठी पुण्याकडे रवाना होणार आहेत.