मेट्रो सात आणि मेट्रो दोन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन रविवारी झाले. मात्र मेट्रो तीन, चार, पाच आणि सहा या प्रकल्पांच्या बांधणीला सुरुवातही झालेली नाही. दहिसर पूर्व ते अंधेरी हा सातवा टप्पा कमी अंतराचा व उन्नत असल्याने इतर टप्प्यांआधी पूर्ण होण्याची शक्यता आहे. मेट्रोचा पहिला टप्पा, वर्सोवा ते घाटकोपर हा ११.४ किलोमीटरचा असून तो जून २०१४ मध्ये पूर्ण झाला.

सातवा मार्ग

दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मार्ग
>१६.५ किलोमीटर उन्नत मार्ग. १६ स्थानके
>२०२१ मध्ये रोज पाच लाखांहून अधिक प्रवासी वापर करणे अपेक्षित
> प्रकल्पाची किंमत – ४,७३७ कोटी रुपये

मेट्रो २ – पहिला टप्पा

दहिसर ते डी. एन. नगर मार्ग
(दहिसर- चारकोप- वांद्रे- मानखुर्द
या मेट्रो-दोन प्रकल्पातील पहिला टप्पा)
> १८.५ किलोमीटरचा उन्नत मार्ग. १७ स्थानके
> २०२१ पासून रोज चार लाखांहून अधिक प्रवासी वापर करणे अपेक्षित
> प्रकल्पाची किंमत – ४,९९४ कोटी रुपये