मुंबईमधील हॉटेल, बार, पब रात्रभर सुरू ठेवायचे की नाही याबाबत चर्चेला उधाण आले असताना लेडीज बारसाठी बदनाम झालेल्या पनवेल व नवी मुंबईनगरीमधील सुमारे १२८ लेडीज बार शुक्रवारपासून बंद करण्यात आली आहेत.
पोलिसांच्या कारवाईचा धसका घेतल्याने या बारमध्ये काम करणाऱ्या महिला वेटरांनी काढता पाय घेतल्याने येथील बारसंस्कृती थांबल्याचे बोलले जात आहे.  यामुळे एकीकडे बारमालक धास्तावले तर दुसरीकडे बारसंस्कृतीमुळे उद्ध्वस्त झालेल्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांच्या खाक्याविषयी समाधान व्यक्त केले आहे.
पनवेलमध्ये २४ व नवी मुंबईमध्ये १०४ लेडीज सव्‍‌र्हिस बार आहेत. लेडीज सव्‍‌र्हिस बारच्या नावाने सुरू असणाऱ्या बारमध्ये महिला वेटरांच्या नावाने नर्तकींचा नाच सुरू असतो.
पनवेल व नवी मुंबईत लेडीज बारमध्ये काम करणाऱ्या महिलांवर मागील वर्षी साडेचारशे वेळा कारवाई केल्याची  नोंद  पोलीस आयुक्तालयात झालेली आहे.
लेडीज सव्‍‌र्हिस बारमध्ये अश्लील चाळे नसावेत यासाठी मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. पोलिसांची भूमिका न्याय्य आहे, असे  पनवेलचे सहायक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी सांगितले.