News Flash

राज्यात उद्यापासून रात्रीची जमावबंदी

करोना निर्बंधांच्या कठोर अंमलबजावणीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश 

(संग्रहित छायाचित्र)

राज्यात करोना प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने रविवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर के ला. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी परिस्थितीतीनुसार शहरांमध्ये टाळेबंदी लागू करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच मार्गदर्शक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. मॉल्स रात्री ८ वाजता बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

राज्यात काही दिवसांपासून करोना महासाथीची दुसरी लाट आली असून दररोज बाधितांचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य कृती दलाचे सदस्य, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून करोनाची सद्य:स्थिती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना जाणून घेतल्या.

टाळेबंदी लागू करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. परंतु टाळेबंदीमुळे सारे जीवनमान बदलते हा पूर्वानुभव लक्षात घेता सरसकट टाळेबंदी लागू के ली जाणार नाही. त्याऐवजी रविवारी रात्रीपासून जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पाच किं वा त्यापेक्षा अधिक नागरिक बाहेर एकत्र फिरू किंवा जमू शकणार नाहीत. रात्रीच्या वेळी लोक अनावश्यक बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने जमावबंदी लागू करण्यात आली.

ब्रिटनसारख्या देशात दुसरी लाट आल्यानंतर त्यांनी दोन-अडीच महिन्यांच्या टाळेबंदीनंतर हळूहळू पुन्हा काही गोष्टी खुल्या करण्यास सुरुवात केली आहे. आपल्याकडेही धोका टळलेला नाही, उलट तो अधिक वाढला आहे हे लोकांनी लक्षात घेण्याची गरज आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. येत्या काळात ती आणखी किती वाढेल हे सांगता येत नाही. अशावेळी कठोर उपाययोजनांचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ज्या जिल्ह््यांत रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे तेथे आवश्यकता असेल तर टाळेबंदी लागू करावी, पण ती अचानक लागू करू नये. लोकांना कारणे सांगून टाळेबंदी लागू करावी, अशा सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

आदेश आणि इशारे…

*  लोकांनी करोना प्रतिबंधाचे नियम पाळले नाहीत तर नाइलाजाने अधिक कठोरनिर्बंध लागू करावे लागतील, असा मुख्यमंत्र्यांचा इशारा.

*  खासगी आस्थापनांना कर्मचारी उपस्थितीसंदर्भात आणि कार्यालयीन वेळेत बदल करण्याबाबत दिलेल्या सूचनांच्या पालनावर लक्ष ठेवावे.

*  सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर घातलेली बंधने पाळावीत.

रुग्णालये, उपचारकेंद्रांसाठी…

*  करोना रुग्णांच्या उपचारासाठी सुरू केलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांच्या इमारती, जागा यांची अग्निसुरक्षा तपासली जावी.

*  औषधसाठा, रुग्णालयामधील सोयी-सुविधा, ऑक्सिजन साठा आणि पुरवठा यासंबंधी योग्य ती कार्यवाही करावी.

*  कृत्रिम श्वसनयंत्रणा, अतिदक्षता विभाग आणि ऑक्सिजन खाटांची संख्या वाढवण्यात याव्यात.

*  चाचणीचे प्रमाण वाढवण्याबरोबरच वाढत्या रुग्णसंख्येला पुरेशा ठरतील अशा आरोग्य सुविधा आहेत का याचे नियोजन करावे.

मॉल्स रात्री ८ वाजता बंद

मॉल्स, मद्यालये, हॉटेल्स, सिनेमागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी मार्गदर्शक सूचनांची आणि निर्बंधांची अंमलबजावणी होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच मॉल्स रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत बंद राहतील याची काळजी घ्यावी. गर्दी होणार नाही हे पहावे, सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर घातलेली बंधने पाळावीत, अशा सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

जमावबंदी म्हणजे?

रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेली नाही, फक्त जमावबंदी लागू के ली जाईल, असे सरकारी प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. याचाच अर्थ पाच किं वा त्यापेक्षा अधिक नागरिकांना एकत्र फिरता येणार नाही किं वा त्यांच्या प्रवासावर बंधने येऊ शकतात. गेल्या वर्षीही काही काळ रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली होती.

पुन्हा टाळेबंदीची अजिबात इच्छा नाही. परंतु, वाढती रुग्णसंख्या विचारात घेता राज्यभर उभारलेल्या सेवा-सुविधाही कमी पडतील की काय, अशी परिस्थिती आहे. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनांनी वैद्यकीय सुविधा, खाटा आणि औषधांची उपलब्धता यावर लक्ष केंद्रित करावे.

– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 12:26 am

Web Title: night curfew in the state from tomorrow abn 97
Next Stories
1 ‘वेळ चुकली असती तर..’
2 सीएसएमटी ते पनवेल मार्गावरही आता वातानुकूलित लोकल
3 जादा ६६ पैसे देऊन १०० टक्के हरित ऊर्जा
Just Now!
X