राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शनिवारी अयोध्येच्या दौऱ्यावर होते. उद्धव ठाकरे या दौऱ्यात रामलल्लाचे दर्शन घेतलं. त्याचबरोबर राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेतर्फे एक कोटी रुपये देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. ठाकरे यांच्या या घोषणेवर आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. ‘मुलाच्या पेग्विंन हट्टासाठी ४५ कोटी रुपये, पण राम मंदिरासाठी फक्त कोटी रुपये,’ असा सवाल करत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

राम जन्मभूमी बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर मध्ये बराच वेळ गेल्यानंतर दौऱ्याची तारीख शिवसेनेकडून घोषित करण्यात आली. अखेर सात मार्च रोजी उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेण्याआधी पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यात राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेच्या वतीनं एक कोटी रूपये देणार असल्याचं सांगितलं.

demolishing building , citizens, Nandivali, dombivli, trouble of dust
Video : डोंबिवलीत नांदिवलीत रहिवासी, प्रवासी धुळीच्या लोटांनी हैराण; पुनर्विकासासाठी इमारत तोडताना नियम धाब्यावर
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
millions of old vehicles running on pune road no re registration after fifteen years
पुण्यातील रस्त्यावर लाखभर जुनी वाहने! पंधरा वर्षे होऊनही पुनर्नोंदणी नाही
complainant get back rs 3 5 lakh duped by online fraud with the help of kashimira police
वसई: ऑनलाईन फसवणुकीतील सव्वा तीन लाख रुपये मिळवून दिले, काशिमिरा पोलिसांनी तत्पर कारवाई

उद्धव ठाकरे यांच्या घोषणेनंतर नितेश राणे यांनी उपहासात्मक टीका केली आहे. राणे यांनी एक ट्विट केलं आहे. ‘लाज नाही वाटली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राम मंदिरासाठी फक्त एक करोड रुपये जाहीर करताना, मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी ४५ कोटी पण राम मंदिराला फक्त एक कोटी???,’ असं नितेश राणे म्हणाले.

नितेश राणे नेहमीच शिवसेनेवर विविध मुद्यांवरून टीका करत असतात. अयोध्येच्या निधीवरून केलेल्या टीकेला अद्याप शिवसेनेकडून उत्तर देण्यात आलेलं नाही.