News Flash

विनाअनुदानित गॅस ५० रुपयांनी महाग

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना महागाईचा तडाखा बसला आहे.

घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महाग करण्यात आला आहे. त्यामुळे नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना महागाईचा तडाखा बसला आहे.
गुरुवारी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात करण्यात आली होती. मात्र दुसरीकडे विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत वाढ करुन सरकारने नागरिकांना महागाईचा जोरदार फटका दिला आहे. मोदी सरकारने यापूर्वीच दहा लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना सिलेंडरवर मिळणारे अनुदान रद्द केले आहे. मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ करण्यात आली असून, नव्या किंमती मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहेत.
काल पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करुन नववर्षाच्या पूर्वसंध्येला पेट्रोल कंपन्यांनी देशवासियांना खुशखबर दिली होती. पेट्रोल ६३ पैसे प्रति लिटर आणि डिझेल १.०६ पैशांनी स्वस्त करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2016 7:09 pm

Web Title: non subsidised lpg rates hiked by rs 50
टॅग : Lpg
Next Stories
1 मुंबईत ५३९ तर ठाण्यात ७७५ तळीरामांवर कारवाई
2 अनोखे लीपवर्ष
3 मरिन ड्राईव्हवर प्रकाशझोत सोडणाऱ्या दिव्यांची सर्रास विक्री
Just Now!
X