30 November 2020

News Flash

आता उबरच्या अॅपमधून बुक करु शकता काळी-पिवळी टॅक्सी

उबरने पहिल्यांदाच कुलाबा ते वरळी परिसरातल्या काळया-पिवळया टॅक्सी चालकांसोबत करार केला असून त्यांना उबरचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

दक्षिण मुंबईत तुम्हाला उबरची टॅक्सी मिळत नसेल तर उबरच्या अॅपमधून तुम्ही काळी-पिवळी टॅक्सी बुक करु शकता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उबरने पहिल्यांदाच कुलाबा ते वरळी परिसरातल्या काळया-पिवळया टॅक्सी चालकांसोबत करार केला असून त्यांना उबरचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे एखाद्यावेळी उबरची वातानुकूलित टॅक्सी उपलब्ध नसेल तर प्रवासी काळया-पिवळया टॅक्सीची निवड करु शकतात. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

काळया-पिवळया टॅक्सीच्या शुल्काबाबत आरटीओचे जे नियम आहेत त्यानुसारच शुल्क आकारले जाईल. आम्ही काळया-पिवळया टॅक्सीच्या नेटवर्कची बांधणी करत आहोत. आता कुठे सेवा सुरु झालीय. जास्तीत जास्त काळया-पिवळया टॅक्सी चालकांना उबरच्या अॅपशी जोडण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढच्या काही आठवडयात उबर अॅपवरुन जास्तीत जास्त काळया-पिवळया टॅक्सीची सेवा उपलब्ध होईल. त्यामुळे प्रवाशांना परवडणाऱ्या दरात नॉन एसी टॅक्सीचा पर्याय उपलब्ध होईल.

उन्हाळयात टॅक्सी सेवेला भरपूर मागणी असते. काळी-पिवळी टॅक्सी मागणी आणि पुरवठयामधील तफावत भरून काढेल. काळी-पिवळी मीटरवर चालते त्यामुळे वरळीपर्यंत प्रवासाचे पैसेही वाचतील असे उबरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. फोर्ट ते वरळी प्रवासासाठी उबर गो कडून १४० रुपये आणि उबर प्रिमियमसाठी १८० रुपये आकारले जातात. आता काळया-पिवळया टॅक्सीतून प्रवासासाठी १२० रुपये आकारले जातील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 4:42 pm

Web Title: now u can book kaali peeli taxis from uber app
Next Stories
1 आपल्या हद्दीतील व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनना शोधा, पोलिसांना आदेश
2 VIDEO – पुण्यात हॉटेलमध्ये घुसली फॉर्च्यूनर कार, वेटरचा मृत्यू
3 डी. के. जैन यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती
Just Now!
X