30 September 2020

News Flash

अर्धवट बांधकामांना भोगवटा प्रमाणपत्र : तक्रार करण्याचे आवाहन

याप्रकरणी ग्राहक पंचायतीला काही तक्रारी मिळाल्या आहेत.

 

 

रियल इस्टेट कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेल्या रेरा नियामक प्राधिकरणाच्या कचाटय़ात सापडू नये, यासाठी विकासकांना महापालिका तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने जारी केलेल्या काही भोगवटा प्रमाणपत्रांबाबत (ओसी) संशय व्यक्त करण्यात आला आहे. अर्धवट अवस्थेत बांधकाम असतानाही भोगवटा प्रमाणपत्र जारी करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. अशा प्रकारे ओसी जारी झाल्या असल्यास तक्रारी करण्याचे आवाहन मुंबई ग्राहक पंचायतीने केले आहे.

याप्रकरणी ग्राहक पंचायतीला काही तक्रारी मिळाल्या आहेत. अनेकांनी अर्धवट अवस्थेतील बांधकामांची छायाचित्रे पाठविली आहेत. तरीही या प्रकल्पांना पालिका किंवा झोपु प्राधिकरणाने भोगवटा प्रमाणपत्र दिल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. अशा तक्रारी एकत्र करून महारेराचे अध्यक्ष गौतम चॅटर्जी यांची भेट घेतली जाणार आहे. अशा प्रकरणात ग्राहक पंचायत तक्रारदाराची भूमिका बजावणार आहे. महारेरानेही या प्रकरणात स्वत:हून दखल घ्यावी, असे आवाहन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ग्राहक पंचायतीच्या ०२२- २६२८१८३२/३९ किंवा २६२८८६२४ या दूरध्वनीवर तसेच panchayat@gmail.com या मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 2:49 am

Web Title: occupancy certificate to constructions rera act 2017
Next Stories
1 ज्येष्ठ हिंदी कवी चंद्रकांत देवताले यांचे निधन
2 तोटय़ातील एसटीची स्वच्छता ४४६ कोटींची?
3 सुरक्षा नियमांचे दही!
Just Now!
X