06 August 2020

News Flash

टाळेबंदीत रिकाम्या हातांना ऑनलाइन जुगाराचे वेड

मटका, कॅसिनोदेखील सुरूच; रूलेट, ब्लॅकजॅक खेळणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ

मटका, कॅसिनोदेखील सुरूच; रूलेट, ब्लॅकजॅक खेळणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ

जयेश शिरसाट, लोकसत्ता

मुंबई : सक्तीच्या टाळेबंदीमुळे एकीकडे दुकाने, बाजारपेठा बंद असले तरी, तंबाखूपासून अमली पदार्थापर्यंत आणि मटक्यापासून कॅसिनोपर्यंत सर्व काही सुरळीत सुरू असल्याने व्यसनांवर आणि व्यसनाधीनतेवर या निर्बंधांचा काडीचाही परिणाम झालेला नाही. कॅसिनोतले रूलेट, ब्लॅकजॅकसारखे जुगार तर घरबसल्या खेळण्याची व्यवस्था निर्माण झाल्याने टाळेबंदीत ऑनलाइन जुगार खेळणाऱ्यांची संख्या वाढल्याची माहिती मिळते. त्यातच टाळेबंदीमुळे अनेकांना काही कामच न उरल्याने तेही जुगाराकडे ओढले जात असल्याचे दिसून येत आहे.

टाळेबंदीत एकही दिवस न चुकता कल्याण, मेन आणि जनता या तीन प्रमुख मटक्यांवर लाखो रुपयांचा जुगार खेळला जात आहे. पूर्वी मुंबईतल्या प्रत्येक उपनगरात मटक्याचे अड्डे असत. त्यात मटक्यासोबत चक्री (कॅ सिनोतील रूलेट), अंदर-बाहर, तितली पोपट, पताडा आदी जुगारही चालतात. मटक्याचे व्यवहार आधीपासूनच व्हॉट्सअ‍ॅपवरून सुरू आहेत. त्याला आता संकेतस्थळांची जोड मिळाली आहे. या संकेतस्थळांवर देशभर सुरू असलेल्या मटक्याचे निकाल प्रसिद्ध होतात. गोव्यातील कॅसिनो बंद असले तरी बहुतांश कॅसिनो मालकांनी संके तस्थळ, अ‍ॅप तयार करून घेतले आहे. त्यावर घरबसल्या रूलेट, ब्लॅक जॅक, अंदर-बाहर आदी जुगार खेळले जातात. सट्टेबाजांनी जशी चोरटी संके तस्थळे, अ‍ॅप विकसित के ली त्याच धर्तीवर कॅसिनोतील जुगार सुरू आहेत. आपला कॅसिनो जुगार खेळावा यासाठी चालक-मालकांकडून लघुसंदेश धाडले जातात. समाजमाध्यमांवर ऑनलाइन कॅसिनोच्या जाहिराती सुरू झाल्या आहेत. ऑनलाइन व्यवहाराद्वारे पॉइंट्स विकत घ्यायचे. त्यावरच जुगार खेळायचा. जिंकल्यास पॉइंट्स वाढणार. वाढलेले पॉइंटसऐवजी पैसे (वळण) घेण्याची व्यवस्था या माध्यमांवर उपलब्ध आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टाळेबंदीत ऑनलाइनऐवजी लाइव्ह कॅसिनोला जास्त प्रतिसाद मिळतो आहे. त्याचप्रमाणे ऑनलाइन पोकर खेळणाऱ्यांचीही संख्या टाळेबंदीत वाढली आहे.

अवैध जुगार केंद्रे सुरूच

मुंबईत प्रत्येक उपनगरात १३, २१, २७ पानांच्या रम्मी, तीन पत्ती म्हणजेच फ्लश याजुगारांचे क्लब सुरू होते. टाळेबंदीत हे क्लब बंद असले तरी जुगारी किं वा पत्त्यांच्या आहारी गेलेले जागा शोधून ‘फिल्ड’ बसवतात. दोनच दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलिसांनी बैंगनवाडी परिसरातल्या एका झोपडीत सुरू असलेल्या क्लबवर धाड घातली, तर अन्य ठिकाणी तीन पत्त्यांच्या अड्डय़ावर धाड घालण्यात आली. दुसरीकडे शासनमान्य लॉटरी केंद्रे बंद आहेत. मात्र पूर्वीही अवैध किं वा शासनाचा महसूल बुडवून स्वत:च निकाल जाहीर करणारी लॉटरी केंद्रे सुरू होती. सध्या लॉटरीचे व्यसन असलेले अशा अवैध केंद्रांवर आपले नशीब अजमावताना दिसत आहेत.

ऑनलाइन कॅ सिनो, जुगार मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे, ही बाब खरी आहे. मात्र ही माध्यमे उपलब्ध करून देणाऱ्या कं पन्यांचे सव्‍‌र्हर अशा देशांमध्ये आहेत जेथे जुगार गुन्हा ठरत नाही. त्यामुळे अशा कं पन्यांवर कारवाई करताना अनेक अडचणी, कायदेशीर पेच निर्माण होतात. केंद्र सरकार अशी संके तस्थळे किं वा अ‍ॅपवर बंदी घालू शकते. राज्याच्या सायबर विभागाने जुगार, सट्टा उपलब्ध करून देणाऱ्या संके तस्थळांबाबत माहिती मिळवण्यास सुरुवात के ली आहे. त्यावर कारवाई व्हावी यासाठी योग्य ते प्रयत्नही के ले जातील.

– यशस्वी यादव, पोलीस महानिरीक्षक (सायबर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 1:14 am

Web Title: online gambling increase in lockdown zws 70
Next Stories
1 समाजमाध्यमांवर ‘चाहते’ वाढविणाऱ्या धंद्याचे पितळ उघड
2 वयोवृद्धाला तीन लाखांचा ऑनलाइन गंडा
3 डहाणू-चर्चगेट लोकल चालवा
Just Now!
X