चार दिवसानंतर मुंबई विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवर विमान वाहतूक सुरु झाली आहे. सोमवारी रात्री मुसळधार पावसामुळे स्पाइस जेटचे विमान लँडिंग करताना धावपट्टीवरुन घसरले होते. हे विमान अडकून पडल्यामुळे मुख्य धावपट्टी बंद होती. जयपूरहून मुंबईला येणारे स्पाइस जेटचे विमान धावपट्टीवरुन घसरले होते. या विमानात १६७ प्रवासी होते.

मुख्य धावपट्टी आणि टॅक्सी वे च्या मध्ये अडकले होते. संध्याकाळी पावणेपाच वाजल्यापासून मुख्य धावपट्टीवरुन उड्डाणे सुरु झाली आहेत. एअर इंडियाच्या इंजिनिअरींग सर्व्हीसच्या टीमने गुरुवारी रात्री उशिरा बरेच प्रयत्न करुन हे विमान धावपट्टीवर आणले व टो करुन हँगरमध्ये घेऊन गेले.