सुवर्ण खरेदीवर ग्राहकांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी

सोने खरेदीवर बक्षिसे लुटण्याची संधी देणाऱ्या ‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’ला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. २७ ऑक्टोबरपासून सुरू झालेली ही ‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजना’ ८ नोव्हेंबपर्यंत सुरू राहणार आहे. अभिनेत्री मृणाल दुसानीस या योजनेत सहभागी झालेल्या सराफांपैकी लागू बंधू आणि एम. के. घारे ज्वेलर्स यांच्या अनुक्रमे बोरिवली पश्चिम आणि कांदिवली पश्चिम येथील दुकानांना गुरुवारी (१ नोव्हेंबर) भेट देणार आहे.

सुवर्णलाभ योजनेत सोने खरेदीसह बक्षिसे मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. ‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’त सहभागी असलेल्या सराफांकडून ग्राहकांनी उपरोक्त कालावधीत तीन हजार रुपये वा त्यापेक्षा अधिक किमतीचे सोने वा सोन्याचे दागिने खरेदी करायचे आहेत. ग्राहकांनी खरेदी केलेल्या या दागिन्यांवर ग्राहकांना ‘लकी कूपन’ दिले जाणार आहे. ग्राहकांनी हे कूपन भरून दुकानातील ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये जमा करायचे आहे. योजनेच्या शेवटच्या दिवशी योजनेत सहभागी असलेल्या दुकानांमधून सर्व कूपन जमा केले जाणार आहेत. सर्व कूपन्स एकत्र करून सोडत पद्धतीने विजेत्यांची निवड केली जाईल. विजेत्यांची नावे ‘लोकसत्ता’मधून जाहीर केली जातील. या विजेत्यांना सहल, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, ए.सी. अशी आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेसाठी नियम व अटी लागू आहेत.

‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’चे प्लॅटिनम पार्टनर लागू बंधू, गोल्ड पार्टनर्स एम. के. घारे ज्वेलर्स, श्री नेमिनाथ ज्वेलर्स, नम्रता ज्वेलर्स, सेंको ज्वेलर्स आणि वामन हरी पेठे ज्वेलर्स आहेत. तर व्ही. एम. मुसळुणकर ज्वेलर्स, मे. पांडुरंग हरी वैद्य आणि कंपनी ज्वेलर्स, एम. व्ही. पेंडुरकर ज्वेलर्स, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, सौभाग्य ज्वेलर्स, राका ज्वेलर्स, मे. पांडुरंग हरी वैद्य अ‍ॅण्ड सन्स ज्वेलर्स, चिंतामणी ज्वेलर्स आणि शुभ ज्वेल हे सिल्व्हर पार्टनर आहेत. सर्पोटेड बाय मराठा ज्वेलर्स असलेल्या या योजनेसाठी के सरी टूर्स ट्रॅव्हल पार्टनर, डीजी १ आणि राणेज पैठणी हे गिफ्ट पार्टनर तर भद्रकाली प्रॉडक्शन्स आणि एनडीज फिल्म वर्ल्ड हे एंटरटेन्मेट पार्टनर आहेत.