‘नीट’ परीक्षेवरून झालेल्या घोळावरून विरोधकांनी उच्च व तंत्र तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना लक्ष्य केले आहे. याप्रकरणी जबाबदारी स्वीकारून तावडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. तर मला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही, असे प्रत्युत्तर तावडे यांनी दिले आहे.

तावडे यांच्यावर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांचे अनेक आरोप झाले. यापाठोपाठ ‘नीट’ परीक्षेवरून तावडे यांनी घोळ घातला. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि धनंजय मुंडे यांनी केला आहे.

केंद्र व राज्यात एकाच पक्षाचे सरकार असतानाही केंद्राचा पाठिंबा मिळविण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीकाही विखे-पाटील यांनी केली.

राज्यातील विद्यार्थ्यांचे हित जपण्यात तावडे अपयशी ठरल्याचा ठपका मुंडे यांनी ठेवला.