राज्यात करोना रुग्णांची वाढती संख्या आणि वैद्यकीय प्राणवायूचा जाणवू लागलेला तुटवडा याचा विचार करून, जिल्ह््यांच्या आवश्यकतेनुसार करोना रुग्णालयांमध्ये प्राणवायू निर्मिती युनिट उभारण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. त्यासाठी लागणारा खर्च व मान्यतेचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आले आहेत.

राज्यात करोना साथरोगामुळे आपक्तालीन परिस्थिती उद्भवली आहे. फे बु्रवारीपासून करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दररोज ६० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यांना उपचारादरम्यान प्राणवायूची गरज वाढत आहे. करोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या, राज्यात उत्पादित होणारा एकू ण प्राणवायू व सद्य:स्थितीत वैद्यकीय वापरासाठी लागणारा प्राणवायू यांचे गुणोत्तर लक्षात घेता, राज्यात प्राणवायूचा तुटवडा भासत आहे. त्याचा विचार करून नवीन प्राणवायू निर्मिती युनिट उभारण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे.

या संदर्भात राज्य शासनाने सोमवारी जारी के लेल्या आदेशात करोना रुग्णालयांमध्ये प्राणवायू निर्मिती युनिट उभारण्याबाबतची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह््यांच्या आवश्यकतेनुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती व जिल्हा तांत्रिक समितीची प्रशासकीय मान्यता घेऊन प्राणवायू निर्मिती युनिट उभारायचे आहे. त्याकरिता राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी, राज्य आपत्ती निवारण निधी व जिल्हास्तरीय उपलब्ध निधीमधून खर्च करायचा आहे. त्याला राज्य सरकारने या आदेशाद्वारे मान्यता दिली आहे.