News Flash

परमार आत्महत्या प्रकरण: चारही नगरसेवकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

या चारही नगरसेवकांना अटक होण्याची शक्यता आहे.

बांधकाम व्यावसायिक सुरज परमार

ठाणे येथील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ठाण्यातील नगरसेवक हनमंत जगदाळे, सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण आणि नजीब मुल्ला यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी फेटाळला. त्यामुळे या चारही नगरसेवकांना अटक होण्याची शक्यता आहे.
परमार यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी हनमंत जगदाळे, सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण आणि नजीब मुल्ला या चार नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर या चौघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून अंतरिम दिलासा दिलेला होता. त्यांच्या अटकपूर्व जामिनावर न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. सोमवारी सुनावणीवेळी विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी या चौघांच्या कोठडीची आवश्यकता स्पष्ट केली होती. त्या पार्श्वभूमीवर या चौघांचाही अटकपूर्व जामीन मंगळवारी फेटाळण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2015 12:46 pm

Web Title: parmar suicide case 4 corporators bail application rejected
Next Stories
1 वीज बिघाडावर महावितरणचा स्वयंचलित उतारा
2 नव्या वर्षांत ठाण्यात झटपट पारपत्र
3 ठाणे स्थानकातील वाहनतळाच्या कामाला अखेर सुरुवात
Just Now!
X