मुंबई : क्रॉफर्ड मार्केटमध्ये लोहार चाळीत तीन मजली युसूफ इमारत आहे. रात्री सव्वा नऊच्या सुमारास या इमारतीच्या मागच्या बाजूचा भाग कोसळला. यात ढिगाऱ्याखाली दोन ते तीन जण अडकले होते.अग्निशमन दलाच्या चार गाडय़ा व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखालून दोन जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू होते. ही इमारत म्हाडाची असल्याचे सांगितले जाते. खबरदारीचा उपाय म्हणून युसूफ इमारतीबरोबरच त्याला लागूनच असलेली द्वारकादास इमारतही रिकामी करण्यात आली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 10, 2019 11:01 pm