मुंबईमधील तब्बल १,८२० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यास मुंबई महापालिकेने परवानगी दिली असून, काही तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात अपयशी ठरलेल्या २५६ मंडळांना मंडप परवानगी नाकारण्यात आली आहे. तर २७४ मंडळांचे अर्ज परवानगीच्या प्रक्रियेत आहेत.

मुंबईमध्ये २,७४० गणेशोत्सव मंडळे सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करतात. त्यासाठी मंडप उभारण्यात येतात. या मंडपांसाठी मंडळांना पालिकेकडून परवानगी घ्यावी लागते. आतापर्यंत मंडप परवानगीसाठी २,३५० मंडळांनी पालिकेकडे अर्ज केले होते. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केलेल्या १,८२० मंडळांना पालिकेने मंडप उभारण्यास परवानगी दिली आहे, तर २७४ मंडळांचे अर्ज परवानगीच्या प्रक्रियेत आहेत.