News Flash

खंजेरीवादक सत्यपाल महाराज यांच्यावर चाकूहल्ला

आयोजकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.

Satyapal Maharaj: नायगाव दादर येथे बुद्ध जयंतीनिमित्त सत्यपाल महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.

सप्तखंजेरीवादक व कीर्तनकार सत्यपाल महाराज यांच्यावर मुंबईत एका माथेफिरूने चाकूहल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यात सत्यपाल महाराज जखमी झाले आहेत. आयोजकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे. ही घटना दि. १२ मे रोजी मुंबईतील नायगाव दादर घडली. येथे बुद्ध जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम झाल्यानंतर घडली.

नायगाव दादर येथे बुद्ध जयंतीनिमित्त सत्यपाल महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर काही युवक फोटो काढण्यासाठी मंचावर आले. महाराजांनी त्यांच्याबरोबर फोटो काढले. त्याचवेळी तोंडाला पट्टी बांधून एकजण महाराजांसमोर आला. त्यानेही फोटो काढण्याचा बहाणा करत महाराजांच्या मानेला जोरात दाबले आणि पोटात चाकूचे वार केले. आयोजकांना हल्ला झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी हल्लेखोरास ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. सत्यपाल महाराजांना उपचारासाठी केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव कुणाल किशोर जाधव असल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, महाराजांनी आपण सुखरूप असल्याचे सांगितले. हल्ला करणारा व्यक्ती कोणत होता, हे आपल्याला माहीत नाही, असे त्यांनी म्हटले. मी कीर्तन चांगले केले होते. कार्यक्रमानंतर त्या व्यक्तीने माझ्यावर हल्ला केला, असे सत्यपाल महाराज यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितले. पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 9:39 am

Web Title: person stab them satyapal maharaj in mumbai
Next Stories
1 महाराष्ट्रवासियांना पेट्रोल, डिझेल दरकपातीचा फायदा नाहीच; राज्य सरकारने अधिभार वाढवला
2 मुंबई विद्यापीठाचे दात घशात!
3 पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यांची कामे?
Just Now!
X