09 March 2021

News Flash

पेट्रोल, डिझेल दरवाढ सुरूच

पेट्रोल, डिझेल दरवाढीने सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे

अवघ्या एकदिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोलच्या दरात मंगळवारी पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल ०.११ पैसे तर डिझेल ०.२४ पैशांनी महागले आहे.

पेट्रोल, डिझेल दरवाढीने सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. पाच रूपयांची करकपात झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचीदरवाढ सुरूच आहे. आज मुंबई आणि दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर २१ पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर ८७.५० रूपये झाले आहे. तर दिल्लीमध्ये प्रति लिटर पेट्रोल ८२.०३ रुपये झाले आहे. पेट्रोलसह डिझेलच्या दरवाढीवाचा भडकाही उडाला आहे. मुंबईमध्ये डिझेल प्रतिलिटर ३१ पैशांनी वाढले आहे. मुंबईमध्ये डिझेल आता ७७.३७ रूपये प्रति लिटर झाले आहे. नवी दिल्लीमध्ये डिझेल प्रति लिटर ७३.८२ रूपये मिळेल. नवी दिल्लीमध्ये डिझेल प्रति लिटर २९ पैशांनी वाढले आहे. केंद्र आणि राज्य शासनाने इंधनाच्या दरात कपात केल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. डिझेलच्या दरांमध्ये शनिवारी आणखी काही पैशांची घट झाली, मात्र करकपात झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून पेट्रोलच्या दरात वाढ सुरू झाली आहे.

Petrol and Diesel prices in #Delhi are Rs 82.03 per litre (increase by Rs 0.21) and Rs 73.82 (increase by Rs 0.29). Petrol and Diesel prices in #Mumbai are Rs 87.50 (increase by Rs 0.21) and Rs 77.37 (increase by Rs 0.31), respectively. pic.twitter.com/YLMM5H2PDR

— ANI (@ANI) October 8, 2018

रविवारी राजधानी दिल्लीमध्ये प्रति लिटर १४ पैशांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली. तर मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर १४ पैशांनी तर डिझेलचे दर प्रति लिटर ३१ पैशांनी वाढले. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पाच रुपयांची घट होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी प्रत्यक्षात पेट्रोलच्या दरामध्ये ४.३६ रुपयांनी, तर डिझेलच्या दरामध्ये केवळ २.५९ रुपयांची कपात करण्यात आली. २०१४ मध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर ६० रुपयांच्या आसपास होता. २०१७ मध्ये तो ८० रुपयांच्या पुढे गेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2018 7:29 am

Web Title: petrol and diesel prices increase today
Next Stories
1 अमित शाह यांच्या कार्यक्रमात महिलांशी गैरवर्तन, अंतर्वस्त्रेही तपासल्याचा आरोप
2 इंटरपोलच्या ‘बेपत्ता’ प्रमुखांचा राजीनामा, चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं चीनने केलं मान्य
3 गुजरातमध्ये यूपी-बिहारींविरोधात हिंसक आंदोलन, आतापर्यंत 342 जणांना अटक
Just Now!
X