मराठीतून भाषणाची सुरुवात करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेट्रो पाचचे भूमिपूजन केले. छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे या सगळ्यांना अभिवादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भूमिका मांडली. कल्याण-ठाणे-भिवंडी या मेट्रोमुळे जोडले जाणार आहे. मेट्रो पाचमुळे मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईल असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांचाही उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात केला. मुंबईतील रेल्वेसाठी शेकडो कोटींचा निधी दिला. लवकरच पावणे तीनशे कीमी मेट्रोचे जाळे उभारणार अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

मागील चार वर्षात मुंबईत मेट्रोचे जाळे पसरवण्यासाठी अनेक योजनांची सुरूवात आमच्याच सरकारने केली. मुंबईत 2006 मध्ये पहिल्यांदा मेट्रोच्या पहिल्या योजनेची सुरुवात झाली. पण आठ वर्षे हा प्रकल्प रखडला होता. हे प्रकरण कुठे अडकलं ते सांगता येणार नाही. आमच्या आधीचं सरकार आठ वर्षात फक्त 11 किमीचा मार्गच उभारू शकलं का? आणि ते कामही अपूर्णच कसं राहिलं? असेही प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थित केले.

मुंबई लोकलसाठी शेकडो कोटी रूपयांची तरतूद केली. इथल्या जुन्या रेल्वे पुलांचं नुतनीकरण करण्यात आलं. मुंबई लोकलशिवाय वाहतुकीच्या इतर माध्यमांचाही विस्तार केला ज्यात मेट्रो सिस्टीम हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांचंही कौतुक केलं. मुंबईकरांचं हृदय विशाल आहे आणि मुंबई हे देशाचं स्वप्न करणारी भूमि आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.