पोलीस शिपायाच्या उपक्रमाचे कौतुक

मुंबई : करोनाकाळात पोलीस दलातील अनेकांनी माणुसकीसाठी चौकट सोडली. कफ परेड पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले शिपाई तेजस सोनवणे हे त्याचे ताजे उदाहरण. गरजूंचे हाल पाहून तेजस यांनी स्वखर्चाने खासगी मोटरगाडीचे रुग्णवाहिके त रूपांतर के ले. हे वाहन कफ परेडच्या झोपडपट्टय़ांमधील गरजूंच्या मदतीला धावून येत आहे.

गणेशमूर्तीनगर या वस्तीबाहेर माझा ‘पॉइंट’(बंदोबस्तासाठी नेमून दिलेले ठिकाण) आहे. दोन आठवडय़ांपूर्वी एक तरुण धावत माझ्याकडे आला. त्याच्या पत्नीला प्रसूतिकळा सुरू झाल्या होत्या. तिला लवकरात लवकर रुग्णालयात नेणे आवश्यक होते. पण रस्त्यावर एकही वाहन नव्हते. हा प्रसंग मनाला चटका लावून गेला. रुग्णवाहिका अपुऱ्या म्हणून शासनाला दोष देण्यापेक्षा एक जबाबदार नागरिक म्हणून मदतीचा हात आपण पुढे करावा या हेतूने रुग्णवाहिका किं वा रुग्णांना रुग्णालयात पोहोचवणारे वाहन उपलब्ध करावे, असे ठरवल्याचे तेजस यांनी सांगितले.

पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजकु मार डोंगरे यांना कल्पना सांगितली. त्यांची परवानगी मिळताच वाहनाचा शोध सुरू के ला. मित्रांनी आपली मारुती ओमनी गाडी देऊ के ली. गाडीमध्ये रुग्णाला झोपवता येईल आणि एखाद-दुसरा नातेवाईक सोबत बसू शके ल, अशी व्यवस्था करून घेतली. आता हे विशेष वाहन गणेशमूर्तीनगरच्या तोंडावर २४ तास उभे असते, असे तेजस यांनी सांगितले.

या वाहनातून तेजस स्वत: रुग्णांना रुग्णालयात सोडतात. रुग्णांचा खोळंबा होऊ नये म्हणून याच वस्तीतल्या एका चालक तरुणाला सज्ज ठेवण्यात आले आहे. वस्तीतले रुग्ण तेजस यांच्या रुग्णवाहिके तून कामा, जेजे, नायरसह सेंट जॉर्ज रुग्णालयात पोहोचत आहेत.

रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. रुग्णवाहिके च्या अनुपलब्धतेमुळे रुग्ण दगावल्याचही उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीत पर्याय उपलब्ध करणाऱ्या तेजस यांचे सध्या पोलीस दलातून कौतुक सुरू आहे. कर्तव्य सांभाळून समाजासाठी प्रत्यक्ष मदत करणारा जवान आपल्या चमूत आहे, याचा अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रि या कफ परेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डोंगरे यांनी  व्यक्त के ली.