तीन दिवसांत केवळ ११ तिकिटे, २९ पासची विक्री

मुंबई: पश्चिम रेल्वेवर वातानुकू लित लोकल सुरू होताच पहिल्या तीन दिवसांत अवघी ११ तिकीट व २९ पासची विक्री झाली आहे. करोनाच्या धास्तीने प्रवाशांनी अद्यापही या लोकलकडे पाठच फिरवली आहे.

करोनाचा संसर्ग झपाटय़ाने पसरू नये यासाठी सरकारी, खासगी कार्यालयांबरोबरच खासगी वाहनांमधील वातानुकू लित यंत्रणा बंद ठेवा किं वा त्याच्या तापमानावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आल्या. टाळेबंदी होताच मार्चपासून पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बरवरील वातानुकू लित लोकलची सेवाही बंदच ठेवण्यात आली. गेल्या सहा महिन्यांपासून बंद ठेवलेली वातानुकू लित लोकल सेवा अखेर १५ ऑक्टोबरपासून पश्चिम रेल्वेवर सुरू झाली.

ही सेवा सुरू होताच पहिल्या दिवशी आठ तिकीट आणि एका महिन्याचे सहा पास प्रवाशांनी काढले, तर १६ ऑक्टोबरला एक तिकीट आणि १२ पासांची विक्री झाली. १७ ऑक्टोबरलाही अल्प प्रतिसादच मिळाला. दोन तिकीट आणि ११ पास विक्रीला गेल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. अशा रीतीने एकू ण ११ तिकीट आणि २९ पासची विक्री झाल्याने अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले. करोनाच्या धास्तीने प्रवाशांनी वातानुकूलित लोकलचा प्रवास सध्यातरी नाकारलेला आहे.

६७ हजारांचा महसूल

१५ ऑक्टोबरला ३०० हून अधिक प्रवाशांनी प्रवास के ल्याची नोंद आहे. यात पासाचे गणित रेल्वेकडून वेगळ्या पद्धतीने मांडले जाते. एक पासधारक  एका महिन्यात अप-डाऊन मिळून ५० वेळा प्रवास करणार. त्याप्रमाणे ५० प्रवासी असे गणित आहे. १५ ऑक्टोबरला सहा पास काढले असतील तर तेव्हापासून एका महिन्यात दररोज एकू ण ३०० प्रवाशांचा प्रवास होणार हे गणित त्यामागे आहे. तीन दिवसांत पश्चिम रेल्वेला ६७ हजार रुपयांचा महसूल मिळाला.