16 October 2019

News Flash

मुंबईतील नागपाडा भागात इमारतीचा भाग कोसळला, तिघे जण अडकल्याची भीती

घटनास्थळी अग्निशमन दलाचे तीन बंब दाखल झाले आहेत, मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहेत

मुंबईतील नागपाडा भागात एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा भाग कोसळून ढिगाऱ्याखाली तिघेजण अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. नागपाडा भागातल्या पीर खान रस्त्यावर या इमारतीचे बांधकाम सुरू होते. या इमारतीचा जो भाग कोसळला त्या ढिगाऱ्याखाली तिघेजण अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत अशी माहितीही समजते आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाचे ३ बंब, एक रेस्क्यू व्हॅन आणि एक रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून मदत आणि बचाव कार्यही सुरू करण्यात आले आहे. काही वेळापूर्वीच ही घटना घडल्याचे समजते आहे.

First Published on April 15, 2019 4:35 pm

Web Title: portion of a slab of an under construction building collapsed at peer khan street in nagpada today 2 to 3 people likely to be trapped under debris