अग्निशमन दलाच्या ‘परिमंडळ-१’चे उपप्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांची सोमवारी प्रमुख अग्निशमन अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. या बाबतची घोषणा महापौर स्नेहल आंबेकर यांनी सोमवारी सभागृहात केली.काळबादेवीच्या हनुमान गल्लीमधील ‘गोकुळ निवास’ला लागलेली आग विझविताना इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत प्रमुख अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर यांच्यासह चार अधिकारी होरपळले होते. त्यापैकी दोघे घटनास्थळीच शहीद झाले. त्यामुळे अग्निशमन दल प्रमुख पदाचा तात्पुरता भार प्रभात रहांगदळे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. नेसरीकर यांच्या मृत्यूनंतर पालिका प्रशासनाने रहांगदळे यांच्या नियुक्तीची घोषणा महापौरांनी सोमवारी सभागृहात केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 7, 2015 2:06 am